जेपी नड्डा यांची प्रकृती बिघडली
दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू
जेपी नड्डा यांची एंजिओग्राफी करण्यात आली
जेपी नड्डा यांची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तात्काळ दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेपी नड्डा यांना अस्वस्थ वाटत होते त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या अनेक टेस्ट करणम्यात आल्या. एम्स रुग्णालयातच त्यांची कोरोनरी अँजिओग्राफी करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सध्या डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.
एम्स दिल्लीकडून एक अधिकृत निवेदन इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहे. यामध्ये रुग्णालयाने सांगितले की, 'माननीय केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची १३ ऑगस्ट २०२६ रोजी प्रकृती बिघडली. सायंकाळी कोरोनरी अँजिओग्राफीसह अनेक चाचण्यांद्वारे तपासणी करण्यात आली. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्यावर हृदयरोग विभागात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. '
जे. पी. नड्डा हे मोदी सरकारमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत. संघटनेतही त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांनी भाजपचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. नितीन नबीन यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी भाजपची सर्व सूत्रे त्यांच्या हातात होती. जेपी नड्डा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. जेरी नड्डा यांच्या समर्थकांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
आरोग्य मंत्री नड्डा यांनी १३ ऑगस्ट रोजी आपल्या कुटुंबीयांसह घरी तिरंगा फडकवला. याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्यांनी सर्व नागरिकांना 'हर घर तिरंगा' अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनी लिहिले, 'पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार, 'हर घर तिरंगा' अभियान देशभरात एका उत्सवाप्रमाणे साजरे केले जात आहे. याच उत्साहाने मी आज माझ्या निवासस्थानी राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला.'
'८० व्या स्वातंत्र्यदिनी, 'हर घर तिरंगा' या जनआंदोलनाअंतर्गत देशभरातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आणि जल्लोष आहे. भारतीय जनता पक्षदेखील ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक शहरात आणि गावात 'तिरंगा यात्रा' आणि 'तिरंगा अभियान' आयोजित करून स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. चला, या स्वातंत्र्यदिनी पूर्ण आत्मसन्मानाने आपल्या घराच्या छतावर तिरंगा फडकवूया आणि आपल्या राष्ट्राच्या सन्मानाचे आणि वैभवाचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाबद्दलचा आपला आदर आणि अभिमान अधिक दृढ करूया. जय हिंद.', असे जेपी नड्डा यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.