political news india Saam TV
देश विदेश

Political News: भाजपमध्ये इनकमिंग सुरू, लोकसभेपूर्वी विरोक्षी पक्षांना भगदाड पडणार; PM मोदींची ताकद वाढणार!

Political Leaders Join BJP: लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील अनेक राजकीय पक्षांना मोठं भगदाड पडणार, असा दावा भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने केला आहे.

Satish Daud

Latest Political News

ऐन लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे. विरोधी पक्षाचे अनेक आमदार, खासदार तसेच पदाधिकारी भाजपचं कमळ हाती घेत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षात नेते शिल्लक राहणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, लोकसभेपूर्वी देशातील अनेक राजकीय पक्षांना मोठं भगदाड पडणार, असा दावा भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोणकोणत्या पक्षाचे नेते भाजपात जाणार?

२० फेब्रुवारीपासून, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष (BSP) आणि आम आदमी पार्टी (AAP) यांसारख्या विरोधी पक्षांतील विद्यमान आमदारांचा एक गट भारतीय जनता पार्टीत (BJP) सामील होईल, असे भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी साम टीव्हीला सांगितलं आहे. त्यामुळे विरोधकांचं टेन्शन वाढलंय.

केवळ खासदार आणि आमदारच नाही, तर नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले अनेक आमदारही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. माझा शब्द लिहून ठेवा, असंही भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं आहे. (Latest Marathi News)

लोकसभेपूर्वी पंतप्रधान मोदींची ताकद वाढणार?

विशेष बाब म्हणजे युपीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राहिलेले अनेक नेते भाजपमध्ये (BJP) येण्यास इच्छुक आहे, पण पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्यासोबत चर्चा केली जात असल्याचं भाजप नेत्याने सांगितलं आहे. त्यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्यास पंतप्रधान मोदींची ताकद वाढणार आहे.

"महाराष्ट्रातील अनेक नेते भाजप प्रवेशासाठी आतुर"

भाजपमध्ये प्रवेश करण्यास महाराष्ट्रातील अनेक नेते आतुर असल्याची माहिती देखील भाजप नेत्याने दिली. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातील (Sharad Pawar) बडा नेता तसेच काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. शिवसेना ठाकरे गटातील नेतेही भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचं भाजप नेत्याने सांगितलं आहे.

अलीकडेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपचे कमळ हाती घेतल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे आणखी एक बडा नेता आमच्या संपर्कात आहे, असा दावा भाजप नेत्याने केला आहे. मध्यप्रदेशातील काँग्रेसचे नेते कमलनाथन देखील भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT