PM Modi, Amit Shah, J. P. Nadda SAAM TV
देश विदेश

Loksabha Election 2024 : भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती; नारायण राणेंसह बड्या नेत्यांना महत्त्वाच्या सूचना?

साम टिव्ही ब्युरो

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. आगामी निडणुकीत सत्ता कायम राखण्यासाठी भाजपकडून सर्व पर्याय तपासले जात आहे.

कर्नाटक निवडणुकीनंतर बॅकफूटवर आलेल्या भाजपला यापुढे कोणतीही जोखीम पत्करायची नाही. त्यामुळे भाजपने आता राज्यसभेतील बड्या नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे.

त्यामुळे राज्यसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात दिसण्याची शक्यता आहे. नारायण राणे सिंधुदुर्गातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या नेतृत्वाने पक्षाच्या राज्यसभेच्या खासदारांना जे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघ शोधून तिथे निवडणूक लढण्याच्या सूचना दिल्या आहेत . (Political News)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्र्यांना याबाबच सूचना देण्यात आली आहे. (Latest Marath News)

कोणते मंत्री लढवू शकतात निवडणुका?

  • निर्मला सीतारामन तामिळनाडूतून निवडणूक लढवू शकतात.

  • परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तामिळनाडूतून निवडणूक लढवू शकतात.

  • पीयूष गोयल महाराष्ट्रातून निवडणूक लढवू शकतात.

  • धर्मेंद्र प्रधान ओडिशातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

  • नारायण राणे कोकणातून निवडणूक लढण्याच शक्यता.

  • सर्बानंद सोनोवाल आसाममधून निवडणूक लढण्याची शक्यता.

  • ज्योतिरादित्य सिंधिया राजस्थानातून निवडणूक लढण्याची शक्यता.

  • अश्विनी वैष्णव ओडिशातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

  • हरदीप सिंग पुरी पंजाब किंवा जम्मू-काश्मीरमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

  • मनसुख मांडविया गुजरातमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

  • भूपेंद्र यादव हरियाणा किंवा राजस्थानमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

  • परशोत्तम रुपाला गुजरातमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

SCROLL FOR NEXT