Bihar Politics: Nitish Kumar, Tejashwi Yadav & Samrat Choudhary Meetings AI Image
देश विदेश

Political News : राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत, एकाचवेळी दिल्ली आणि राज्यात हालचाली

Bihar Political News : बिहारच्या राजकारणात बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. नीतीश कुमार, तेजस्वी यादव आणि सम्राट चौधरी यांच्या महत्त्वाच्या बैठकांमुळे नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांना वेग आला आहे.

Alisha Khedekar

  • बिहारमध्ये दिल्लीपासून पटण्यापर्यंत महत्त्वाच्या राजकीय बैठकांना वेग

  • नीतीश कुमार यांनी जदयूच्या खासदारांसोबत बैठक

  • तेजस्वी यादव यांनी आरजेडीच्या वरिष्ठ नेते आणि खासदारांसोबत चर्चा केली

  • सम्राट चौधरी यांची भाजपच्या मंत्र्यांसोबत बंद दाराआड बैठक

बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा बैठकांचे सत्र सुरू झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दिल्लीपासून पटण्यापर्यंत झालेल्या महत्त्वाच्या बैठकांमुळे राज्यात मोठ्या राजकीय उलटफेराच्या चर्चांना वेग आला आहे. दरम्यान आगामी काळात बिहारच्या राजकारणात काय बदल होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दिल्लीतील सुनहरी बाग येथील निवासस्थानी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नीतीश कुमार यांनी पक्षाच्या खासदारांची बैठक घेतली. कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत खासदारांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांची माहिती दिली. तसेच संसदेत बिहारशी संबंधित प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.

याचदरम्यान आरजेडीचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही पक्षाच्या वरिष्ठ नेते व खासदारांची बैठक घेतली. आगामी राजकीय रणनीती, बिहारमधील महत्त्वाचे प्रश्न आणि संसदेत जनहिताचे मुद्दे प्रभावीपणे मांडण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. नीतीश कुमार यांच्या सलग बैठकींच्या पार्श्वभूमीवर तेजस्वींची बैठकही चर्चेचा विषय ठरली आहे.

दरम्यान, पटण्यात मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक पार पडली. बैठक संपल्यानंतर चौधरी यांनी केवळ भाजपच्या कोट्यातील मंत्र्यांची आपल्या निवासस्थानी स्वतंत्र बैठक बोलावली. या बैठकीत JDU, HAM आणि RLM च्या मंत्र्यांना सहभागी करण्यात आले नसल्याचे सांगितले जात आहे. बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर काही मंत्री माध्यमांपासून माध्यमांना टाळून मागच्या दरवाजातून बाहेर पडले. त्यामुळे या बैठकीमागे नेमके काय राजकीय गणित आहे, याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र, सध्या कोणत्याही मोठ्या राजकीय निर्णयाची अधिकृत घोषणा झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SSR News : १७ राज्यात SSR, पण महाराष्ट्राला वगळलं, नेमकं कारण काय?

Tesla Roadster : टेस्लाची नवी भरारी! बहुप्रतिक्षित 'रोडस्टर' इलेक्ट्रिक कार अखेर लाँच, एका सेकंदात 97किमी अंतर करणार पार

Maharashtra News Live Update: लोणावळ्यात परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

Vande Bharat Sleeper : स्लीपर वंदे भारत मुंबईतून 'याच' महिन्यात धावणार, ८ तास वाचणार; जाणून घ्या वेळ आणि तिकीट दर

Four eggs a day: दिवसाला 4 अंडी खाणं खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? डॉक्टरांनी सांगितलं कोलेस्ट्रॉलवर कसा होतो परिणाम

SCROLL FOR NEXT