uttar pradesh crime  Saam tv
देश विदेश

2 महिला अन् 3 पुरुष नको त्या अवस्थेत; गुपचूप सुरू होतं भलतंच प्रकरण, खोलीतील प्रकार पाहून पोलीस चक्रावले

Uttar pradesh crime : बंद खोलीत गुपचूप भलतंच प्रकरण सुरु होतं. पोलिसांच्या कारवाईनंतर या प्रकरणाचा भंडाफोड झाला.

Vishal Gangurde

देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश

३ पुरूष आणि २ महिला पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांकडून पुढील कारवाईला सुरुवात

उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी छापेमारीत ३ पुरूष आणि २ महिलांना ताब्यात घेतलं आहे. मंडावाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. छापेमारीदरम्यान पोलिसांनी ५ मोबाइल, ३३०० रुपये आणि काही साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंडावाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांना माहिती मिळाली. एका ठिकाणी बेकायदेशीररित्या देहविक्रीचा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात अनेकांना रंगेहाथ पकडलं.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लोकांची चौकशी केली. त्यावेळी एकाने म्हटलं की, एका महिला बेकायदेशीररित्या देहविक्रीचा व्यापार करत होती. ही महिलाच सर्व गोष्टीत हाताळत होती. पैसा कमावण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून देहविक्रीचा व्यापार करत असल्याचे मुख्य आरोपीने कबूल केले. देहविक्रीतून मिळणारी कमाई एकमेकांमध्ये वाटून घेत होते.

पोलिसांनी या प्रकरणी अमित कुमार, सोनू, वसीम यांच्या नावाचा समावेश आहे. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या प्रकरणातील इतर आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. बेकायदेशीररित्या देहविक्री करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई केली जात आहे, असेही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. तत्पूर्वी, आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. देहविक्रीचा व्यापार करणाऱ्या टोळीशी आणखी कोणाचं कनेक्शन आहेत,याचा शोध पोलिसांकडून घेतला जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT