आम्ही राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या पाठिशी; क्राइम ब्रांचच्या कारवाईनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar Political News : आम्ही राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या पाठिशी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवारांनी पोस्ट करत भूमिका पोस्ट केली.
ajit pawar news
ajit pawar Saam Tv
Published On
Summary

नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीच्या विरोधात तक्रार

राजकीय सल्लागार असलेल्या नरेश अरोरा यांच्यावर क्राइम ब्रांचची कारवाई

कारवाईवर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार असलेल्या नरेश अरोरा यांच्या पुण्यातील वाकडेवाडी परिसरात असणाऱ्या कार्यालयावर आज दुपारी पुणे पोलिसांनी कारवाई केली. पुणे पोलिसांना डिझाईन बॉक्स या कंपनीच्या विरोधात एक तक्रार प्राप्त झाली होती. ही तक्रार लेखी नसून फक्त तोंडी होती. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी या ठिकाणी पुणे पोलिसांची क्राइम ब्रांच आली होती.या कारवाईनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ajit pawar news
शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा; बड्या नेत्याचा पक्षाचा तडकाफडकी राजीनामा

नरेश अरोरा यांच्या कारवाईवर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी म्हटलं की, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कार्यरत असलेले नरेश अरोरा आणि त्यांची संस्था डिझाइनबॉक्स्ड यांच्या पुणे कार्यालयात आज क्राईम ब्राँचचे काही अधिकारी माहिती घेण्याच्या उद्देशाने उपस्थित झाले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रक्रियेदरम्यान आवश्यक ती माहिती देण्यात आली. या संपूर्ण सहकार्य करण्यात आलं. या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाहीये'.

ajit pawar news
निवडणूक प्रशासनाची घरावर धाड; शिंदे गटाच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्पष्ट करू इच्छितो की, या संपूर्ण विषयात पक्ष हा नरेश अरोरा आणि त्यांची संस्था 'डिझाइनबॉक्स्ड' यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायद्याचा सन्मान करतो. सर्व वैधानिक प्रक्रियांना सहकार्य करण्यावर विश्वास ठेवतो. या प्रकरणातही संबंधित यंत्रणांना आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करण्यात आले आहे, असे अजित पवार पुढे म्हणाले.

ajit pawar news
ऐन निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा; शिंदे गट-भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीला नवं वळण, नेमकं काय घडलं?

'कोणताही संभ्रम, अफवा किंवा अनावश्यक नॅरेटिव्ह पसरवू नये, असे आम्ही आवर्जून सांगू इच्छितो. तथ्यांच्या आधारेच कोणताही निष्कर्ष काढावा, हीच आमची भूमिका आहे. या संपूर्ण विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयम, जबाबदारी आणि स्पष्टतेसह आपली भूमिका मांडत आहे, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com