तरुणांची वाढती संख्या अन् रोजगाराच्या संधी कमी
७५०० कॉन्स्टेबल पदांसाठी १० लाख अर्ज
पीएचडी अन् पदवीधारकांनीही केलेत अर्ज
देशात सध्या तरुणांची संख्या खूप जास्त आहे. परंतु त्या तुलनेने रोजगाराची संधी खूप कमी आहे. रोजगाराची संधी कमी असल्याने बेरोजगार तरुणांची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. याचीच प्रचिती मध्य प्रदेशमध्येदेखील आहे. मध्यप्रदेशमध्ये ७,५०० कॉन्स्टेबल पदासाठी तब्बल १० लाख अर्ज आले आहेत.
कॉन्स्टेबल पदासाठी इंजिनियर, पीएचडीधारकांनी केले अर्ज (Constable Recruitment)
काही हजार पदांसाठी १० लाख तरुणांनी अर्ज केले आहेत. धक्कादायक म्हणजे कॉन्स्टेबल पदासाठी पीएचडी पदवीधारक, इंजिनियर आणि पदव्युत्तर पदवीधारक तरुणांचा समावेश आहे. उच्चशिक्षित तरुणांनी या नोकरीसाठी अर्ज केले आहे. या भरतीसाठी पात्रता फक्त १०वी निश्चित करण्यात आली होती. परंतु राज्यातून अनेक उच्चशिक्षित तरुणांनी या नोकरीसाठी अर्ज केले आहे.
उच्चशिक्षित तरुणांचा अर्ज
याबाबत एका अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की, अर्जदारांच्या यादीत ४२ पीएचडीधारक आहे. १२,००० तरुण हे इंजिनियर आहेत तर हजारो तरुण पदवीधर आणि मास्टर्स केलेले आहेत. या नोकरीसाठी पगार १९,५०० ते ६२,००० रुपये मिळणार आहे. तरीही अनेक उच्चशिक्षित तरुणांनी अर्ज केले आहेत.
निवडप्रक्रिया
या भरती मोहिमेत अर्जप्रक्रिया १५ सप्टेंबरला सुरु झाली होती. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर होती. अवघ्या २० दिवसात लाखो तरुणांनी या नोकरीसाठी अर्ज केले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल भरतीसाठीची लेखी परीक्षा ३० ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. त्यानंतर फिजिकल टेस्ट होणार आहे.दरम्यान, १० लाख अर्जांमधून ७५०० उमेदवारांची निवड करायची आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.