BEL Recruitment: सरकारी नोकरीची संधी; भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरती; पगार ९०,००० रुपये; अर्ज कसा करावा?

BEL Recruitment 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंजिनियर असिस्टंट ट्रेनी आणि टेक्निशियन सी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
BEL Recruitment
BEL RecruitmentSaam tv
Published On
Summary

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरती

असिस्टंट ट्रेनी आणि टेक्निशियन पदासाठी भरती

सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. इंजिनियर असिस्टंट ट्रेनी आणि टेक्निशियन सी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

BEL Recruitment
Bank Jobs: पंजाब अँड सिंध बँकेत नोकरीची संधी; मिळणार पगार ९३००० रुपये; अर्ज कसा करावा?

भारत इलेक्ट्रॉनिक्समधील इंजिनियरिंग असिस्टंट ट्रेनी आणि टेक्निशियन पदासाठी ३० जागा रिक्त आहेत. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

इंजिनियरिंग असिस्टंट ट्रेनी पदासाठी तुम्हाला २४,५०० ते ९०,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत टेक्निशियन सी पदासाठी २१,५०० ते ८२,००० रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.

पात्रता (Eligibility)

इंजिनियरिंग असिस्टंट ट्रेनी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनियरिंगमध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा केलेला असावा. टेक्निशियन सी पदासाठी उमेदवारांनी एसएसएलसी, आयटीआयमध्ये १ वर्षांची अप्रेंटिसशिप केलेली असावी.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा २८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५९० रुपये शुल्क भरायचे आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरायचे नाही.

BEL Recruitment
DRDO Recruitment: फ्रेशर्स आहात? DRDO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा?

अर्ज कसा करावा? (Application Process)

या नोकरीसाठी अर्ज करताना bel-india.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर होमपेजवर ऑनलाइन अप्लाय लिंकवर क्लिक करा.

यानंतर तुमची सर्व माहिती भरावी. यानंतर तुमच्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा.

यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

BEL Recruitment
Government Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी कंपनीत नोकरी; ११८० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com