PM Narendra Modi
PM Narendra Modi SAAM TV
देश विदेश

PM मोदींवर केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य काँग्रेस नेत्याला भोवलं; पोलिसांनी केली अटक, त्यानंतर...

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) तसेच राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने नोटीस बजावली होती. त्यानंतर कॉंग्रेसच्या गोटातून केंद्र सरकार (central government) आणि सक्तवसुली संचनालयाविरोधात टीकेची झोड उठवण्यात आली. दुसरीकडे कॉंग्रेसच्या नेत्यांनी मोदी सरकारवर टीका करण्याचं सत्रही सुरुच ठेवलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना नागपुरचे कॉंग्रसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांची जीभ घसरली होती. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेवून शेख यांना अटक केली. त्यानंतर शेख (Shaikh Hussain) यांची जामीनावर सुटका करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात शेख हुसेन यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. काँग्रेसकडून ईडीकार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी अनेक नेत्यांनी भाषण केले आणि राहुल गांधी यांना इडीने पाठवलेली नोटीस चुकीची असल्याचा दावा केला. याचदरम्यान, हुसेन यांनी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गिट्टीखदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

त्यानंतर पोलिसांनी शेख हुसेन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी आज शेख यांची चौकशी करुन त्यांना अटक केली. त्यानंतर शेख यांची जामीनावर सुटका करण्यात आली. याचदरम्यान पोलीस स्टेशन बाहेर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. या प्रकरणावर काँग्रेस आमदार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. पोलिसांनी फक्त वादग्रस्त वक्तव्य केलं म्हणून गुन्हा दाखल केला. पण यासंदर्भात आपण पोलीस आयुक्तांकडे दाद मागणार आहोत, असं ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली; विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार

Sushma Andhare Helicopter Crash News : सुषमा अंधारेंच्या हेलिकॉप्टरचा अपघात कसा घडला?

Parenting Tips: मुलांना सुट्ट्यांमध्ये फिरायला घेऊन जाताय? त्यांना आधी शिकवा महत्वाच्या गोष्टी

Josh Baker Death: इंग्लंडच्या २० वर्षीय जोश बेकरच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

Gondia News : १५० रुपये क्विंटलने मोबदला मिळेपर्यंत भरडाई बंद ठेवण्यावर राईस मिलर्स ठाम; ५४० कोटीचे धान पडून

SCROLL FOR NEXT