पुणे : जुने भांडण पेटले; चिडलेल्या जावयाने घरी जाऊन सासूची बाईक जाळली

पुण्यातील एका जावयाने सासूसोबत झालेल्या वादाचा राग चक्क तिच्या दुचाकीवर काढला, त्यानंतर...
Pune Crime News
Pune Crime NewsSaam Tv
Published On

मुंबई : घरात भांड्याला भांडं लागतं असं म्हणतात. जिथे कौटुंबिक कलह, वाद-विवाद होतात अशा ठिकाणी तर संसारातील भांड्यांचा आवाजही कडाडून ऐकायला येतो. छोट्या मोठ्या गोष्टींवरुन सासू- सुनेत नेहमी भांडण होत असतं. पण पुण्यात महात्मा फुले पेठेत सासू आणि जावयाच्या भांडणाने (Family Dispute) नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. विशाल अनिल नाईक या व्यक्तीनं सासूसोबत झालेल्या वादाचा राग चक्क तिच्या दुचाकीवर काढला आहे. सासूच्या दुचाकीला जावयाने पेटवलं आहे. या घटनेत दोन दुचाकी जळून 75 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी सदर महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी विशाल विरोधात खडक पोलीस ठाण्यात (Police complaint filed) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News
'आपला अॅटीट्यूड सुधारा', पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा विराट कोहलीला सल्ला

वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या मुलीचं लग्न विशाल नाईकसोबत झालं होतं. या दाम्पत्याला दोन अपत्यही आहेत. मात्र विशाल पत्तीसोबत नेहमी भांडण करायचा, तिच्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे फिर्यादीच्या मुलीनं पतीच्या जाचाला कंटाळून घटस्फोट घेतला. त्यानंतर त्या मुलीनं दुसरं लग्न केलं. त्यानंतर विशालचे फिर्यादी महिलेसोबत भांडण झाले. दोन दिवसांपूर्वी फिर्यादीची मुलगी मुंबईहून पुण्याला येणार होती.त्याबाबत विचारणा करण्यासाठी विशालने फिर्यादी महिलेला फोन केला होता.

Pune Crime News
मुंबईकरांनो सावधान! कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ, आजची आकडेवारी पाहा

परंतु विशाने केलेल्या फोनला फिर्यादी महिलेनं प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर विशालचा रागाचा पारा चढला. त्यानंतर रागाच्या भरात विशालने फिर्यादी महिलेची दुचाकी पेटवून दिली. या घटनेत दोन दुचाकी जळून 75 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महिलेच्या तक्रारीवरुन खडक पोलीस ठाण्यात आरोपी विशाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com