PM Narendra Modi Saam Digital
देश विदेश

PM Narendra Modi : PM नरेंद्र मोदींच्या सभेत राहुल गांधींचे फोटो ; नेमकं काय आहे प्रकरण?

PM Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या मेळाव्यात ठेवलेल्या खुर्च्यांना राहुल गांधी याचे फोटो आणि स्कॅनर कोडही चिकटण्यात आले होते.

Sandeep Gawade

PM Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. महिला मेळाव्याचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह संपूर्ण राज्य मंत्रिमंडळ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. हा मेगा इव्हेंट ४७ एकर पसरलेल्या विस्तीर्ण भागावर होणार असून, पंतप्रधानांचे भाषण दुपारी ४ वाजता होणार आहे.

या मेळाव्याच्या ठिकाणी ठेवलेल्या खुर्च्यांना राहुल गांधी याचे फोटो आणि स्कॅनर कोडही चिकटण्यात आला होता. त्यामुळे राज्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान व्यवस्थपकांच्या हे लक्षात आल्यानंतर खुर्च्यांवरील राहुल गांधींचा फोटो हटवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली असून सभा नेमकी मोदींची की राहुल गांधींची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार या भागात नुकताच काँग्रेसची सभा झाली. त्यामुळे त्या कार्यक्रमासाठी राहुल गांधींचे फोटो खुर्च्यांवर चिकडवले होते. मात्र, ज्या ठेकेदाराने त्या खुर्च्या काँग्रेसच्या मेळाव्याला पुरवल्या, त्याच खुर्च्या भाजपच्या कार्यक्रमाला पाठवल्या. त्यामुले कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला असून याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे बुधवारी यवतमाळ शहराजवळीळ अनेक रस्त्यांवरील वाहतूक अन्यमार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे 12 वीची परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तसेच राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क संवर्गातील पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरीय लिपिक या पदांसाठी आज परीक्षा घेण्यात य़ेत आहेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aloo Chaat Recipe: संध्याकाळी नाश्त्याला खा चटपटीत आलू चाट, बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी

Maharashtra Live News Update: नाशिकच्या तपोवन परिसरात प्रस्तावित असलेले MICE सेंटरची निविदा अखेर रद्द

Types of Bridal Makeup: यंदा कर्तव्य आहे? मग जाणून घ्या कोण-कोणत्या प्रकारचे असतात ब्राइडल मेकअप

रहमान डकैतच्या एनकाऊंटरनंतर ल्यारीमध्ये नेमकं काय घडलं?

Aloe Vera Benefits For Skin: हिवाळ्यात चेहऱ्याला कोरफड लावण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT