Narendra Modi news Saam tv
देश विदेश

कोट्यवधी लोक गरीबीच्या खाईत जाणार; पंतप्रधान मोदींचा मोठ्या संकटाचा इशारा

Hormuz Strait tensions : नेदरलँडच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी भविष्यातल्या संकटाचा गंभीर इशारा दिलाय. नेमका काय आहे हा इशारा आणि भारतासाठी कोणतं मोठं संकट आहे त्यावरचा हा रिपोर्ट.

Suprim Maskar

आखातातील युद्ध सुरू संपल्यात जमा असलं तरी जगावरचं इंधन संकट टळण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच गडद होत चाललंय. कारण इराण-अमेरिकेनं एकमेकांना शह देण्यासाठी होर्मुझचा जलमार्ग वेठीला धरलाय. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. आणि यामुळेच पंतप्रधान मोदींनी नेदरलँड दौऱ्यात बोलताना इंधनाच्या बाबतीत गंभीर इशारा दिलाय.

या परिस्थितीचा भारताच्या रुपयावर मोठा परिणाम झालाय. गेल्या काही दिवसांत रुपया डॉलरच्या तुलनेत कसा घसरलाय ते पाहूयात

डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण

तारीख - 14 मे 2026

डॉलर 95.71 रुपये

तारीख - 15 मे 2026

डॉलर 94.59 रुपये

16 मे 2026

डॉलर 95.96 रुपये

17 मे 2026

डॉलर 95.97 रुपये

18 मे 2026

डॉलर 96.18 रुपये

या वाढत्या दराचे भारतावरही गंभीर परिणाम झाले आहेत. त्यामुळे मोदींनी इंधन बचतीचा सल्ला भारतीयांना दिला होता. तसंच परकीय गंगाजळी वाचण्यासाठी सोनं खरेदीही टाळण्याचं आवाहन केलंय. मात्र नेदरलँडमधल्या भाषणात त्यांनी थेट जगातले बहुसंख्य लोक गरिबीच्या खाईत लोटली जाणार असल्याची भीती व्यक्त केलीय.

याचे चटके आता भारतीयांना बसायला लागले आहेत. देशात काय काय महागलं ते पाहूयात...

महागाईचा भडका

वस्तू दरवाढ

पेट्रोल 3 रुपये

डिझेल 3.11 रुपये

CNG 2 रुपये

दूध 2 रुपये

आखाती युद्धाच्या तात्कालीक कारणाचा भारताला फटका बसला असला तरी रुपया मात्र गेल्या काही महिन्यांपासून घसरत असल्याचं दिसतंय. त्यामुळे भविष्यात देशाची अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरणांसमोरील आव्हानं कशी पेलली जातात त्यावर सारं भवितव्य अवलंबून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऐन दुष्काळात हजारो लिटर पाण्याची नासाडी; मालेगावला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला गळती

Supreme Court : रील करणारे कोण, पत्रकार कोण हेच समजत नाही; सरकारचं सुप्रीम कोर्टात उत्तर

जळगावमध्ये भीषण अपघात! ट्रक-दुचाकीच्या धडकेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू; अख्ख कुटुंब संपलं

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार गुड न्यूज, महागाई भत्ता कितीने वाढणार?

Business Ideas For Women: महिलांसाठी कमी खर्चात होममेड ज्वेलरीचा बिझनेस; घरबसल्या व्हाल माला माल

SCROLL FOR NEXT