PM Narendra Modi News Saam Tv
देश विदेश

पंतप्रधान मोदींची घोषणा! १,२,५,१० आणि २० रुपयांची नाणी जारी

'आझादी का अमृत महोत्सव'निमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन नाण्यांचे अनावरण झाले.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या प्रतिष्ठित सप्ताह समारंभाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्याहस्ते झाले. यावेळी त्यांनी १,२,५,१० आणि २० रुपयांच्या विशेष नाण्यांचे प्रकाशन केले आहे. ही नाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला समर्पित करण्यात आली आहेत. (PM Narendra Modi News)

ही नाणी लोकांना अमृत महात्सवाची नेहमी आठवण करून देतील आणि राष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी प्रेरित करतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. यावेळी मोदी यांनी दिल्लीतील वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. गेल्या ७५ वर्षात देशासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. तुम्ही सर्व याचे एक भाग आहात. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे असो, अनेकांनी योगदान दिले आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) म्हणाले.

वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय ६ जून ते ११ जूनपर्यंत 'आझादी का अमृत महात्सव' अंतर्गत आयकॉनिक कायक्रमाचे आयोजन केले आहे. या दरम्यान कार्पोरेट मंत्रालय आणि वित्त मंत्रालयाचे प्रत्येक विभाग आपल्या समृद्ध इतिहास आणि येणाऱ्या आव्हाणांसाठी तयारी असल्याचे दर्शवणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रेडिट लिंक्ड सरकारी योजनांसाठी 'जन समर्थ पोर्टल' सुरू केले आहे. हे पोर्टल वेगवेगळ्या योजनांना एकाच ठिकाणी उपलब्ध करणार आहे.

या कार्यक्रमात रुपयांचा प्रवासही दाखवण्यात आला. या प्रवासाची ओळख करून देणारे डिजिटल प्रदर्शनही सुरू झाले आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला वाहिलेल्या नवीन नाण्यांचेही प्रकाशन करण्यात आले. भारतानेही गेल्या आठ वर्षांत विविध आयामांवर काम केले आहे. या काळात देशात वाढलेल्या लोकसहभागामुळे देशाच्या विकासाला चालना मिळाली, देशातील गरीब नागरिकांचे सक्षमीकरण झाले, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

SCROLL FOR NEXT