Vande Bharat Train Inauguration Saam TV
देश विदेश

Vande Bharat Train: रविवारी 11 राज्यांना मिळणार 9 वंदे भारत ट्रेन, पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा कंदील

Vande Bharat Express: रविवारी 11 राज्यांना मिळणार 9 वंदे भारत ट्रेन, पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा कंदील

Satish Kengar

Vande Bharat Express:

रविवारी म्हणजेच 24 सप्टेंबर रोजी 11 राज्यांना 9 वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी काचीगुडा-यशवंतपूर आणि विजयवाडा-एमजीआर चेन्नई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला व्हर्चुअल पद्धतीने हिरवा झेंडा दाखवतील.

रविवारी पंतप्रधान देशभरातील नऊ वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील, त्यापैकी दोन गाड्या दक्षिण मध्य रेल्वेच्या (SCR) अखत्यारीत चालवल्या जातील. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद येथे आहे.

रविवारी रवाना होणाऱ्या नव्या रेल्वे गाड्या पुढीलप्रमाणे आहेत:

1) उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेस (Latest Marathi News)

2) तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्स्प्रेस

3) हैदराबाद-बेंगळूरू वंदे भारत एक्स्प्रेस

4) विजयवाडा-चेन्नई (रेनीगुंता मार्गे) वंदे भारत एक्स्प्रेस

5) पाटणा-हावडा वंदे भारत एक्स्प्रेस

6) कासारगोड-थिरूवनंतपुरम वंदे भारत एक्स्प्रेस

7) राऊरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्स्प्रेस

8) रांची-हावडा वंदे भारत एक्स्प्रेस

9) जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेस

या नऊ रेल्वे गाड्यांमुळे, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओदिशा, झारखंड आणि गुजरात अशा अकरा राज्यांतील दळणवळणाला चालना मिळणार आहे.

या वंदे भारत गाड्या, त्यांच्या निर्धारित मार्गांवर सध्या धावणाऱ्या गाड्यांपैकी सर्वात वेगवान रेल्वे गाड्या असतील आणि त्यांच्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवास वेळेची मोठी बचत होणार आहे. सध्या धावणाऱ्या सर्वात वेगवान गाड्यांशी तुलना करता, राऊरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्स्प्रेस आणि कासारगोड-थिरूवनंतपुरम वंदे भारत एक्स्प्रेस या गाड्या प्रवासाचा वेळ 3 तासांनी कमी करतील.

हैदराबाद-बेंगळूरू वंदे भारत एक्स्प्रेसमुळे या प्रवासाचा अडीच तासांहून अधिक वेळ वाचेल; तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्स्प्रेस हा प्रवास दोन तासांहून अधिक काळ लवकर पूर्ण होईल; रांची-हावडा वंदे भारत एक्स्प्रेस, पाटणा-हावडा वंदे भारत एक्स्प्रेस तसेच जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेस या गाड्या प्रवासाचा सुमारे 1 तास वाचवतील तर उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास नेहमीपेक्षा सुमारे अर्धा तास आधी पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Mumbai News : बोरिवली स्टेशनवर फिल्मी स्टाईल दरोडा, ६ जणांनी लाखो रूपयांवर केला हात साफ

Marathwada Floods : बँकांनीही आवळला शेतकऱ्याभोवती फास; सरकारी बँकांचा, सावकारी कारभार, VIDEO

Cylinder Price: दसऱ्याआधी महागाईचा चटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

SCROLL FOR NEXT