Ramdas Athawale News: 'महिला आरक्षण 2024 मध्ये लागू करणं अडचणीचं आहे', असं का म्हणाले रामदास आठवले...

Ramdas Athawale On Women's Reservation: 'महिला आरक्षण 2024 मध्ये लागू करणं अडचणीचं आहे', असं का म्हणाले रामदास आठवले...
Ramdas Athawale On Women's Reservation
Ramdas Athawale On Women's ReservationSaam Tv
Published On

>> चेतन व्यास

Ramdas Athawale On Women's Reservation:

केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवून महिला आरक्षण विधेयक पास केलंय. हे विधेयक तातडीने लागू करावं, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, आरोप सहन करण्याची आमच्यात ताकत आहे, चांगल काम केलं, तरी आरोप होतात. काँग्रेसला आता दुसरा विषय अजिबात नाहीय. महिला आरक्षण विधेयकला काँग्रेसने लोकसभा आणि राज्यसभेत पाठिंबा दिलेला आहे.

Ramdas Athawale On Women's Reservation
Maharashtra Rain Update: राज्यासाठी पुढील ४ तास महत्त्वाचे; मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार, जाणून घ्या सर्व अपडेट

आठवले म्हणाले की, ''काँग्रेसच म्हणणं आहे की, 2024 मध्ये महिला आरक्षण विधेयक लागू झाल पाहिजे. पण 2024 मध्ये लागू करणं थोडं अडचणीचं आहे. आमचे प्रयत्न सुरु आहे, शक्य असेल तर तो प्रयत्न पूर्ण होईल. (Latest Marathi News)

ते म्हणाले, काँग्रेसच्या विरोधाला आम्ही घाबरत नाही. दरम्यान, रामदास आठवले आज वर्धेच्या चरखा भवन येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, असं म्हणाले आहेत.

Ramdas Athawale On Women's Reservation
Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला गेली, दरदरून घाम फुटला अन् खाली कोसळली; तरुणीसोबत काय घडलं?

आठवले पुढे म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला हवा, अशी आमची मागणी आहे. सध्या मंत्रिमंडळात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचेच मंत्री असून रिपब्लिकन पक्षाचा एकही मंत्री नाही. रिपब्लिकन पक्ष हा महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून लवकरात लवकर राहलेल्या एक वर्षाकारिता मंत्रिमंडळाचा विस्तार करावा आणि त्यात रिपब्लिकन पक्षाला संधी द्यावी, अशी मागणी सुद्धा रामदास आठवले यांनी केलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com