Narendra Modi News, Arvind Kejriwal News, Delhi News Updates  Saam Tv
देश विदेश

PM मोदीजी, आम्हाला सर्वांनाच तुरुंगात टाका; केजरीवाल संतापले

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांना ईडीने अटक केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली: दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांना ईडीने अटक केल्यानंतर आम आदमी पक्षाकडून केंद्रातील भाजप (BJP) सरकारवर आरोप होत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनीही या कारवाईनंतर संताप व्यक्त केला आहे. सत्येंद्र जैन यांच्यानंतर आता मनीष सिसोदिया यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक करण्याचे मोठे कारस्थान आहे, असा खळबळजनक दावा केजरीवाल यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) हात जोडून विनंती आहे की, आम्हाला एकेक करून अटक करू नका, कारण त्याचा दिल्लीच्या विकासकामांवर परिणाम होईल. त्यापेक्षा तुम्ही सर्व मंत्री आणि आमदारांना एकाचवेळी अटक करून चौकशी करावी, अशी उद्विग्नताही केजरीवाल यांनी व्यक्त केली. (Arvind Kejariwal Latest News)

अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावरील अटकेच्या कारवाईसंदर्भात ही पत्रकार परिषद होती. सत्येंद्र जैन यांच्या अटकेमागे कोणते कारस्थान आहे याबाबत कल्पना नाही, पण यापुढे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक करण्याचा कट आहे, असा दावा केजरीवाल यांनी केला. मी काही महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं की, केंद्र सरकार खोट्या गुन्ह्यात अडकवून सत्येंद्र जैन यांना अटक करणार आहे. त्याच सूत्रांकडून मला आता माहिती मिळाली आहे. केंद्र सरकार मनीष सिसोदिया यांनाही अटक करणार आहे. केंद्राने तपास संस्थेला तसे सांगितले आहे, असा दावाही केजरीवाल यांनी केला आहे.

जर सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया हे भ्रष्टाचारी असतील तर, नेमका प्रामाणिक कोण आहे? असा सवालही त्यांनी केला. सत्येंद्र जैन यांच्याविरोधात आधीपासूनच चौकशी सुरू होती. आता पुन्हा चौकशी सुरू केली आहे, असेही ते म्हणाले.

केजरीवाल म्हणाले की, 'दिल्लीचे सर्व आमदार आणि मंत्र्यांना एकाचवेळी अटक करून चौकशी करावी, अशी माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हात जोडून विनंती आहे.' सत्येंद्र जैन हे मोहल्ला क्लिनिक उभारत होते. स्वच्छ पाणी या विषयावर लक्ष देत होते. आता सर्वच कामे थांबली आहेत, याकडेही केजरीवाल यांनी लक्ष वेधले. मला नेमकं माहीत नाही की, अटकेची कारवाई का केली जात आहे. हिमाचल प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कारवाया केल्या जात असल्याचे मला समजले. तर पंजाब निवडणुकीत आपचा विजय झाल्याने सूडभावनेतून ही कारवाई केली जात असल्याचे काही जण सांगतात, असेही केजरीवाल म्हणाले. आम्हाला अटकेची भीती वाटत नाही. आम्हाला सर्वांना एकाचवेळी अटक करा, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT