PM Modi Speech On Avishwas Prastav  SAAM TV
देश विदेश

PM Modi Speech On Avishwas Prastav : गरिबांच्या भूकेची पडली नाही, यांना सत्तेची भूक; PM मोदींचा विरोधकांवर घणाघात

PM Narendra Modi Speech : केंद्र सरकारवर विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, गुरुवारी लोकसभेत निवेदन केले.

Nandkumar Joshi

PM Narendra Modi Speech On Avishwas Prastav in Loksabha : केंद्र सरकारवर विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, गुरुवारी लोकसभेत निवेदन केले. मोदींनी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. तुम्हाला देशातील गरीबांच्या भूकेची पडली नाही. तुम्हाला सत्तेची भूक आहे, असा घणाघात मोदींनी विरोधकांवर केला. (Latest Marathi News)

केंद्रातील भाजप सरकारवर (BJP Government) विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज लोकसभेत निवेदन केले. मोदींनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला. देशाच्या जनतेने आमच्या सरकारवर जो विश्वास दाखवला, त्यांचे आभार मानण्यासाठी मी येथे उभा आहे, असे मोदी म्हणाले.

विरोधकांना चिमटा

पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. देव दयाळू असतो असं म्हणतात. देवाची मर्जी असते की तो कोणत्या न कोणत्या माध्यमातून मनातील इच्छेला माध्यम बनवतो. मी याला देवाचा आशीर्वाद मानतो. देवाने विरोधकांना सांगितलं आणि ते प्रस्ताव घेऊन आले. २०१८ साली देखील अविश्वास प्रस्ताव आणला होता. तेव्हा मी म्हटलं होतं की हा प्रस्ताव आमच्या सरकारची फ्लोअर टेस्ट नाही, असा चिमटा मोदींनी विरोधकांना काढला.

विरोधकांसाठी नो कॉन्फिडन्स

विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. पण जनतेने पूर्ण विश्वासाने यांच्यासाठी नो कॉन्फिडन्स घोषित केले. निवडणुकीत एनडीए आणि भाजपला जास्त जागा मिळाल्या. विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ आहे. २०२४ च्या निवडणुकीत एनडीए आणि भाजप आधीचे सर्व रेकॉर्ड मोडून पुन्हा सत्तेत येणार, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

SCROLL FOR NEXT