Tomato Price Hike : टॉमेटो महागला, विरोधक लालबूंद; केंद्रीय अर्थमंत्र्यांची लोकसभेत मोठी घोषणा

Nirmala Sitharaman On Tomato Price Hike : महागाईचा मुद्दा रिझर्व्ह बँकेपासून संसदेपर्यंत चर्चिला जात आहे.
Nirmala Sitharaman On Tomato Price Hike in Loksabha
Nirmala Sitharaman On Tomato Price Hike in LoksabhaSAAM TV
Published On

Nirmala Sitharaman On Tomato Price Hike : महागाईचा मुद्दा रिझर्व्ह बँकेपासून संसदेपर्यंत चर्चिला जात आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चालू आर्थिक वर्षात महागाई दराचा अंदाज वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे, संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेची धार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.  (Latest Marathi News)

देशात टॉमेटोच्या किंमती (Tomato Price) कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून उचलल्या जाणाऱ्या पावलांबाबत निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली. दिल्ली - एनसीआर विभागात नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनसीसीएफ) द्वारे टॉमेटो ७० रुपये किलो विकला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Nirmala Sitharaman On Tomato Price Hike in Loksabha
No Confidence Motion Debate : निर्मला सीतारामन यांनी एकहाती लढवला किल्ला; काँग्रेसवर तुटून पडल्या

टॉमेटोच्या वाढत्या किंमतींवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत भाष्य केले. एनसीसीएफ या आठवड्याच्या अखेरीस दिल्ली-एनसीआर विभागामध्ये ७० रुपये प्रतिकिलो दराने टॉमेटो विक्रीची योजना तयार करत आहे. एनसीसीएफ आणि नाफेडसारख्या सहकारी समित्यांच्या माध्यमातून वितरीत करण्यासाठी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून टॉमेटो खरेदी केला जात आहे. ही योजना मागील १४ जुलैपासूनच बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यांत आधीपासूनच लागू करण्यात आली आहे, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.

Nirmala Sitharaman On Tomato Price Hike in Loksabha
Sadabhau Khot On Tomato Price: 'परवडत नसेल तर टॉमेटो खाऊ नका', सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. लोकांना स्वस्तात जीवनावश्यक वस्तू हव्या आहेत, त्यामुळे आवश्यक ती ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन निर्मला सीतारामन यांनी दिले. सरकारने आयातीवरील निर्बंध हटवले असून, नेपाळमधून टॉमेटो आयात करण्यास सुरुवात केली आहे. टॉमेटोची पहिली खेप शुक्रवारपर्यंत वाराणसी, लखनऊ आणि कानपूरला पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

कन्झ्युमर डिपार्टमेंटच्या आकडेवारीनुसार, देशात अजूनही टॉमेटोचा भाव प्रतिकिलो २५० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे. दिल्लीत टॉमेटो प्रतिकिलो १६० रुपयांनी विकला जात आहे. गाझियाबादमध्ये ९ ऑगस्टला टॉमेटो १३० रुपये प्रतिकिलोने विकला गेला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com