PM Modi on Avishwas Prastav : विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ, PM नरेंद्र मोदींचा टोला

No Confidence Motion : 2024 च्या निवडणुकीत NDA आणि भाजप आधीचे रेकॉर्ड तोडून पुन्हा सत्तेत येणार आहे, असा विश्वास मोदींना व्यक्त केला.
PM Modi on Avishwas Prastav
PM Modi on Avishwas Prastav Saam TV
Published On

PM Modi In Lok Sabha : विरोधी पक्षाने लोकसभेत मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास प्रस्ताव आणल्याबद्दल विरोधी पक्षाचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, देशाच्या जनतेने आमच्या सरकारवर विश्वास दाखवला, त्यांचे आभार मानण्यासाठी मी आजे इथे उभा आहे. देव दयाळू असतो, असं म्हणतात. मी याला देवाचा आशीर्वाद मानतो की त्याने विरोधकांना सांगितलं आणि ते अविश्वास प्रस्ताव घेऊन आले.

2018 ला देखील देवाचा आदेश होता, तेव्हाही अविश्वास प्रस्ताव आणला होता. तेव्हा मी म्हटलं होतं हा प्रस्ताव आमच्या सरकारची फ्लोअर टेस्ट नाही.

PM Modi on Avishwas Prastav
No Confidence Motion : राजा आंधळा असल्यास द्रौपदीचं वस्त्रहरण होतं, काँग्रेस खासदाराच्या वक्तव्याने अमित शाह ताडकन उठले, अन्...

विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ

त्यावेळी जनेतेने पूर्ण विश्वास दाखवला आणि निवडणुकीत NDA आणि भाजपला जास्त जागा मिळाल्या. विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ आहे. 2024 च्या निवडणुकीत NDA आणि भाजप आधीचे रेकॉर्ड तोडून पुन्हा सत्तेत येणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.  (Latest Marathi News)

PM Modi on Avishwas Prastav
Tomato Price Hike : टॉमेटो महागला, विरोधक लालबूंद; केंद्रीय अर्थमंत्र्यांची लोकसभेत मोठी घोषणा

राजकारण विरोधकांसाठी महत्वाचं

या प्रस्तावावर तीन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मागच्या काही दिवसात दोन्ही सभागृहात अनेक बिल पास झाली. बिलावर चर्चा होणे अपेक्षित होतं, पण राजकारण तुमच्यासाठी महत्वाचं होतं. देशाच्या जनतेनं ज्या कामासाठी यांना इथे पाठवलं त्यांचाही विश्वासघात यांनी केला, अशी टीका मोदींनी विरोधकांवर केली.

विरोधकांची फिल्डिंग, पण सरकारकडून चौकार-षटकार

विरोधकांनी अविश्वास प्रस्तावावर नीट चर्चा केली नाही. विरोधकांनी फिल्डिंग लावली, पण सरकारच्या बाजूने चौकार-षटकार मारले गेले. अविश्वास प्रस्तावावर विरोधक नो-बॉल करत आहेत. मी विरोधी पक्षांना सांगू इच्छितो की, जरा मेहनत करा. तुम्हाला 2018 मध्ये सांगितलं होतं की खूप मेहनत करून या. पण पाच वर्षातही काहीही बदलले नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com