PM Modi Speech : एनडीएची बैठक आज दिल्ली पार पडत आहे. या बैठकीनंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या एकीवर हल्लाबोल केला. काँग्रेसने पक्षांचा स्वार्थासाठी वापर केला. आम्ही विरोधी पक्षात असतानाही सकारात्मक राजकारण केले, आम्ही कधीही नकारात्मक राजकारण केले नाही.
देशातील विरोधी पक्षांच्या बंगळुरू येथील बैठकीवरही पंतप्रधान मोदींनी निशाणा साधवा. देशातील लोक पाहत आहे की हे पक्ष का जमत आहेत? या पक्षांना जोडणारा दुवा कोणता आहे, हेही जनतेला माहीत आहे. आपल्या स्वार्थासाठी मूल्ये आणि तत्त्वांशी कशी तडजोड केली जात आहे, हे सर्वांना दिसत आहे. (Latest Marathi News)
आम्ही कधीच नकारात्मकतेचा मार्ग अवलंबला नाही. कधीही जनादेशाचा अवमान केला नाही. आम्ही विरोधात राहिलो, पण देशाच्या विकासात अडथळा आणला नाही, असं मोदींनी म्हटलं.
मोदी पुढे म्हणाले की, सत्तेच्या मजबुरीसाठी ही आघाडी केली जात आहे. विरोधी पक्षांची एकी भ्रष्टाचाराच्या इराद्याने ही आघाडी केली जात आहे. आघाडी परिवारवादाच्या धोरणावर आधारित आहे. जातीवाद आणि प्रादेशिकता डोळ्यासमोर ठेवून जी आघाडी केली जाते त्यामुळे देशाचे खूप नुकसान होते.
आम्ही केवळ आजच्या गरजांसाठी काम करत नाही, तर येणाऱ्या पिढ्यांचे भविष्यही सुरक्षित करत आहोत. आम्ही वारसा जपण्याबरोबरच विकास करत आहोत. आम्ही मेक इन इंडिया आणि पर्यावरणाच्या रक्षणावरही भर देत आहोत, आमचा हेतू स्पष्ट आहे, आमचे धोरण स्पष्ट आहे आणि आमचा निर्णय पक्का आहे, असंही मोदी यांनी म्हटलं. (Political News)
2014 मध्ये देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावर होती, मात्र आज ती पाचव्या क्रमांकावर आहे. मी तुम्हाला खात्री देतो की एनडीएच्या तिसऱ्या कार्यकाळात आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असेल, असं आश्वासनही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.