Kharge On Sharad Pawar and Uddhav Thackeray : 'शरद पवार-उद्धव ठाकरे लोकप्रिय नेते...'; विरोधकांच्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे नेमकं काय म्हणाले?

Opposition Meeting : विरोधकांच्या ऐक्याला पंतप्रधान मोदी घाबरले आहेत.
Sharad Pawar Uddhav Thackeray
Sharad Pawar Uddhav Thackeray Saam TV
Published On

Opposition Meeting : देशातील 26 विरोधी पक्षांची महत्वपूर्ण बैठक आज बंगळुरु येथे पार पडली. या बैठकीत विरोधी पक्षांच्या या एकजुटीला INDIA म्हणजेच "इंडियन नेशनल डेमोक्रेटिक इंक्लूसिव एलायंस" असं नावही दिलं.

विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. शरद पवार आणि   उद्धव ठाकरे लोकप्रिय नेते असल्याचं खरगे यांनी म्हटलं.

Sharad Pawar Uddhav Thackeray
Uddhav Thackeray in Opposition Meeting : उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल, पुढच्या बैठकीचीही व्यासपीठावरुन केली घोषणा

खरगे नेमकं काय म्हणाले?

विरोधकांच्या एकीमुळे प्रादेशिक पक्षांना धोका निर्माण होत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत काय झालं हे सर्वासमोर आहे. इतर पक्षांनाही असाच धोका आहे. या सर्व पक्षांना तुम्ही एकत्र कसं ठेवाल? पत्रकारांच्या या प्रश्नावर बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं की, शरद पवार मोठे नेते आहे. लोकप्रिय नेते आहेत. ते आमच्यासोबत आहे.

उद्धव ठाकरेदेखील लोकप्रिय नेते आहे. लोक त्यांच्यासोबत आहेत. आमदार जिंकतात आणि येतात हे महत्ताचं नाही. असे आमदार बनवणारे नेते आमच्यासोबत आहेत, असंही खरगे यांनी म्हटलं.  (Latest Marathi News

Sharad Pawar Uddhav Thackeray
Opposition Party Name: यूपीए नव्हे 'INDIA'; विरोधकांच्या आघाडीचे नाव ठरले! काय आहे नेमका अर्थ?

मोदी घाबरले आहेत

एनडीएच्या बैठकीवर टीका करताना खरगे म्हणाले की, मोदींनी एनडीएची 30 पक्षांची बैठक बोलावली आहे. इतके पक्ष नोंदणीकृत आहेत की नाही हे मला माहीत नाही. आधी त्यांना मित्रपक्षांची पर्वा नव्हती, आता त्यांचे अध्यक्ष प्रत्येक राज्यात फिरत आहेत. त्यांच्या युतीचे तुकडे झाले होते जे मोदी एकत्र करत आहेत. विरोधकांच्या ऐक्याला पंतप्रधान मोदी घाबरले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com