Delhi News : दिल्लीत एनडीएची महत्वपूर्ण बैठक पार पडत आहे. या बैठकीला भाजपसोबत असलेले देशातील 38 पक्ष एकत्र आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही या बैठकीला उपस्थित आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याची घोषणाही दोन्ही नेत्यांनी यावेळी केली, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
भविष्यात एनडीए अधिक मजबूत होईल. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 45 जागा निवडून आणू. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून राज्यात 48 पैकी 45 जागा जिंकण्यासाठी एकत्र निवडणूक लढणार, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याची माहिती मिळत आहे. (Latest Marathi News)
लोकसभा निवडणुकीत आम्ही एकत्र राहू. लोकसभेच्या अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असे अजित पवार म्हणाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांनी 10-10 मिनिटे आपली बाजू मांडली. (Political News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.