PM Modi Speech Saam Tv
देश विदेश

PM Modi Speech : PM मोदींनी सुप्रीम कोर्टावर केलं मोठं वक्तव्य; ऐकताच सरन्यायाधीशांनी हसत-हसत जोडले हात

Independence Day Speech : पंतप्रधानांचे भाषण सुरु असताना सरन्यायाधीशांनी हसत-हसत हात जोडले. यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Narendra Modi on Supreme Court :आज भारत देश ७७वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकवत देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी प्रादेशिक भाषेवर महत्वाच भाष्य केलं. यावेळी पंतप्रधानांचे भाषण सुरु असताना सरन्यायाधीशांनी हसत-हसत हात जोडले. यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन १४० कोटी जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी प्रादेशिक भाषांचे महत्त्व सांगितले. सर्वोच्च्य न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा संदर्भ देत प्रादेशिक भाषेचं महत्त्व वाढायला हवे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

लाल किल्ल्यावर संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, निकालाचा 'ऑपरेटिव्ह' भाग एका प्रादेशिक भाषेत असेल. प्रादेशिक भाषांचे महत्त्व वाढत आहे. याचदरम्यान भारताचे सरन्यायाधीश स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला उपस्थित होते. त्यांनी हात जोडून मोदींच्या या टिप्पणीचा स्वीकार केला. यावेळी, इतर पाहुण्यांनी टाळ्या वाजवल्या.

पंतप्रधान मोदी मातृभाषेतील अभ्यासाचा उल्लेख करत आज प्रादेशिक भाषेचे महत्त्व वाढत आहे, असे म्हणाले. आम्ही प्रादेशिक भाषेतील शिक्षण देण्यावर भर दिला आहे. मुलांना मातृभाषेत शिक्षण घेता यावे यासाठी आम्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रादेशिक भाषांच्या अभ्यासावरही भर दिला आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय घेतला होता?

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला होता की, सर्वोच्च न्यायाल्याच्या वेबसाइटवर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये निर्णय उपल्बध करण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयात निकाल आधी इंग्रजीतून हिंदीत भाषांतर करण्यात येते. त्यानंतर त्याचे प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर केले जात आहेत. ५०० पानांचा निकाल एक किंवा दोन पानांमध्ये दिला जाणार आहे. जेणेकरुन, सामान्य लोकांना हा निर्णय समजेल. सुप्रीम कोर्टाने इंग्रजीसह हिंदी, तामिळ, गुजराती आणि ओरिया भाषेत भाषांतर करण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, यंदा २६ जानेवारीला ७५वा प्रजासत्ताक दिन असेल. आता देशातील नागिरकांना प्रेरणा आणि निश्चय करण्यासाठी यापेक्षा मोठी संधी मिळणार नाही. तत्पूर्वी , पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नैसर्गिक आपत्तीतील मृतांना श्रद्धांजली वाहिली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात पैसा येणार

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT