PM Narendra Modi in all india education conference SAAM TV
देश विदेश

PM Modi Video : 'मोदीजींना ओळखता का?...?', PM मोदींच्या प्रश्नावर चिमुकल्याचं भन्नाट उत्तर, सगळ्यांनीच वाजवल्या टाळ्या

PM Narendra Modi in all india education conference : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 'अखिल भारतीय शिक्षण परिषद २०२३'च्या उद्घाटनानिमित्त उपस्थित बालकांशी संवाद साधला.

Nandkumar Joshi

PM Narendra Modi in all india education conference : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 'अखिल भारतीय शिक्षण परिषद २०२३'च्या उद्घाटनानिमित्त उपस्थित बालकांशी संवाद साधला. या संवादाचा व्हिडिओ स्वतः पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिथे भरवलेले प्रदर्शन पाहण्यासाठी मोदी पोहोचताच मुलांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी मोदींना नमस्कारही केला. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुलांच्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदींना बघून मुलं आनंदित होताना या व्हिडिओत दिसत आहेत. मोदींना बघून मुलं त्यांच्या दिशेने जातात. 'नमस्ते मोदी जी' म्हणत आनंदाने त्यांचे स्वागत करतात. मोदींना भेटून आनंद झालेला एक मुलगा त्यांना जाऊन मिठी मारतो.

यावेळी पंतप्रधान मोदींनी या मुलांना कुतूहल म्हणून प्रश्न विचारला. तुम्ही मोदीजींना ओळखता का? अशी विचारणा करतात. त्यावर एका मुलानं, होय मी तुम्हाला टीव्हीवर बघितलं होतं, असं उत्तर दिलं. त्यावर मोदींनी प्रतिप्रश्न केला. कुठे बघितलं होतं, मी टीव्हीवर काय करत होतो, असं मोदींनी त्या मुलांना विचारलं. त्यानंतर मोदी आणि मुलांमध्ये खूप गप्पा रंगल्याचं बघायला मिळतं. तसेच यावेळी मोदींनी मुलांसोबत पेटिंगही केली.

या कार्यक्रमात मोदी म्हणाले की, क्षमतांऐवजी त्यांच्या भाषेच्या आधारे जोखणे हा विद्यार्थ्यांवरील सर्वात मोठा अन्याय आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण देशातील प्रत्येक भाषेला योग्य सन्मान आणि श्रेय देईल. जे लोक आपल्या स्वार्थासाठी भाषेवरून राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना दुकानं बंद करावी लागतील.

इंग्रजी न बोलणाऱ्यांची उपेक्षा

जगात भाषांची संख्या आणि त्यांचे महत्व अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अनेक विकसित देशांना त्यांच्या स्थानिक भाषेमुळे प्रगती करू शकले. त्यांनी युरोपचं उदाहरण दिलं. बहुतांश देश आपल्या मूळ भाषेचा वापर करतात. भारतात अनेक भाषा आहेत. पण जे लोक इंग्रजी बोलू शकत नाहीत, त्यांची उपेक्षा होते आणि त्यांच्या प्रतिभेकडे दुर्लक्ष केले जाते, अशी खंत यावेळी मोदींनी बोलून दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबईत डबेवाल्याची सायकल चोरी; ११ डबे घेऊन चोरांचा ‘लंच ब्रेक’? चोरट्याचा फोटो व्हायरल

Maharashtra Politics: गद्दारांशी युती नको, ठाकरेंचं फर्मान, ठाकरे-शिंदेसेना युतीवरून वादंग

Maharashtra Live News Update: दोंडाईचामध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का, माजी नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश

Fact Check: बिबट्यांच्या जुन्नरमध्ये वाघाचा धुमाकूळ? वस्त्यांमध्ये फिरतोय आता पट्टेरी वाघ?

Ladki Bahin Yojana: e-KYC मधला पहिला मोठा अडथळा दूर; लाडक्या बहिणींची चिंता मिटली, वेबसाईटमध्ये बदल

SCROLL FOR NEXT