PM Narendra modi  Saam tv
देश विदेश

PM Narendra Modi : काँग्रेसचं आणीबाणीचं पाप धुतलं जाणार नाही; संविधानावरील विशेष चर्चेत PM मोदींकडून विरोधकांना प्रत्युत्तर

PM Narendra Modi on Constitution : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानावरील विशेष चर्चेत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. काँग्रेसचं आणीबाणीचं पाप धुतलं जाणार नसल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : 'आपल्या संविधानाची अपेक्षा एकता आहे. देशात आणीबाणी लागू करण्यात आली. या आणीबाणीच्या काळात संविधान संपवण्याचे प्रयत्न काँग्रेसने केले. नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणली. काँग्रेस पक्षाचं आणीबाणीचं पाप धुतलं जाणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. ते संविधानावरील विशेष चर्चेत बोलत होते.

हिवाळी अधिवेशनादरम्यान, संसदेत संविधानावर विशेष चर्चा सुरु आहे. या संविधानाच्या विशेष चर्चेत विरोधकांनी केलेल्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'संविधान निर्माते काही बाबतीत सजग होते. भारताचं संविधान संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. भारताला लोकशाहीच्या जननीच्या रुपात ओळखलं जातं. जगात अनेक देश स्वातंत्र्य झाले. त्यांच्या देशात संविधान देखील लागू झालं. मात्र, तेथील महिलांना मतदानासाठी झगडावं लागलं. आपल्या संविधानात सुरुवातीपासून महिलांना मतदानातचा अधिकार मिळाला आहे'.

'संविधानाच्या यात्रेला ७५ वर्ष पूर्ण झाले आहेत. संविधान निर्मात्यांची दूरदृष्टी आणि योगदानामुळे पुढे जात आहोत. या कार्यक्रमात सहभागी झालो, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो. देश स्वातंत्र्य झाला. त्यावेळी अनेक शक्यता व्यक्त करण्यात आल्या. त्या सर्व शक्यतांवर मात करून संविधानाला इथपर्यंत घेऊन आलो आहे. यासाठी संविधान निर्मात्यांचे आभार मानतो, असे ते पुढे म्हणाले.

'मी संविधानाप्रती विशेष आदर व्यक्त करतो. माझ्यासारखे अनेक लोक येथे पोहोचले नसते. परंतु संविधानामुळे इथपर्यंत पोहोचू शकलो. हे संविधानाचं सामर्थ्य आणि आशीर्वाद होता, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

'काँग्रेसमधील एका कुटुंबाने संविधानाला धक्का पोहोचवण्याची कोणतीही संधी सोडली नाही. मी यासाठी या कुटुंबाचा उल्लेख करतो की, या देशात या कुटुंबाने ५० वर्ष राज्य केलं आहे. त्यामुळे यासाठी देशाला ही बाब जाणून घेण्याचा अधिकार आहे. या कुटुंबाचे कुविचार निरंतर सुरु आहेत, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातच शिवसेनेला घरघर

Haldi Milk Benefits: दररोज सकाळी हळदीचे दूध प्यायल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Wakad Tourism: थंडीच्या दिवसात फिरायला जायचंय? वाकडजवळ असलेला हा किल्ला ठरेल बेस्ट ऑप्शन

Ravindra Chavan : मनसेचा बडा नेता भाजपमध्ये जाणार? रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

'गौरीला मारहाण व्हायची, चेहऱ्यावर खुणा, नणंद म्हणायची..' गौरी गर्जे प्रकरणात अंजली दमानियांकडून धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT