PM Narendra Modi : संविधान निर्मितीत महिलांचं योगदान मोलाचं; लोकसभेत मोदींचं मोठं वक्तव्य | VIDEO

Parliament Winter Session Live : लोकसभेत शनिवारी संविधानवर चर्चा सुरू आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून संविधान निर्मितीत महिलांचा मोलाचा वाटा असल्याचं म्हटलं आहे.

संविधानाचा 75 वर्षांचा प्रवास हा एक संस्मरणीय प्रवास आहे. संविधानाच्या निर्मितीमध्ये महिला शक्तीने संविधान मजबूत करण्याची भूमिका बजावली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शनिवारी लोकसभेत चर्चेचा दुसरा दिवस आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. लोकशाहीचा हा उत्सव मोठ्या अभिमानाने साजरा करण्याची ही संधी असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्या संविधान निर्मात्यांची दैवी दृष्टी आणि योगदान आहे, ज्याच्या आधारे आपण पुढे जात आहोत. 75 वर्षे पूर्ण झाल्याचा हा उत्सव आहे. आज संसदही या उत्सवात सहभागी होऊन आपल्या भावना व्यक्त करत असल्याचा मला आनंद आहे. महिला शक्तीने संविधान मजबूत करण्याची भूमिका बजावली आहे. मूळ विचारसरणीच्या जोरावर त्यांनी संविधान सभेची चर्चा समृद्ध केली आहे. महिलांच्या सूचनांचा राज्यघटना निर्मितीवर मोठा प्रभाव होता. जगातील अनेक देश स्वतंत्र झाले, संविधान बनले, महिलांना अधिकार देण्यात दशके लोटली. आपल्या देशात सुरुवातीपासूनच महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

आज आपण पाहत आहोत की प्रत्येक मोठ्या योजनेच्या केंद्रस्थानी महिला असतात. भारताच्या राष्ट्रपतीपदावर एक आदिवासी महिला आहे, हा योगायोग आहे. ही राज्यघटनेच्या भावनेची अभिव्यक्ती आहे. या सभागृहात महिला खासदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज समाज, राजकारण, शिक्षण, क्रीडा अशा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान देशाला अभिमानास्पद आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com