PM Modi Praises CM Eknath Shinde Saam Digital
देश विदेश

PM Modi Praises CM Eknath Shinde: PM मोदींकडून एकनाथ शिंदेंचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख; मराठीतून भाषणाची सुरुवात

PM Modi Praises CM Eknath Shinde: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे यांचा उल्लेख महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून केला. व्यासपीठावरील मान्यवरांच्या नावाचा परिचय करून दिल्यानंतर मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली.

Sandeep Gawade

PM Modi Praises CM Eknath Shinde

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे यांचा उल्लेख महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून केला. व्यासपीठावरील मान्यवरांच्या नावाचा परिचय करून दिल्यानंतर मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली.

मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली याचा मला अतिशय आनंद आहे. त्यांना मी कोटी कोटी वंदन करतो, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी भाषणाची सुरुवात केली. पंतप्रधानांनी मराठी भाषणातून सुरुवात करताच उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला.

नाशिकमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांनी राजमाता जिजाऊ यांना वंदन केलं आणि याच दिवशी आपल्याला महाराष्ट्राने संधी दिल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राचे आभार मानले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते.

तरुणांच्या सरभागाने लोकशाही मजबूत होईल

नाशिकमध्ये आयोजित युवा महोत्सवाच उद्घाटन आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी आज तरुणांना आणि देशवाशियांना संबोधित केलं. देशातील तरुणांकडून देशाला सर्वात जास्त अपेक्षा आहेत. तरुणींचही देशाच्या विकासात तेवढंच महत्त्व आहे. त्यांनी तेवढाच हातभार लावला आहे. लोकशाहीत तरुणांचा जीतका सहभाग असेल तितकी लोकशाही अधिक मजबूत बनेल. घराणेशीहीच्या राजकारणाला आळा घालता येईल. येणाऱ्या काळात तरुणांनी हे काम केलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारत मॅन्युफॅक्चरींग हब बनतंय

आज भारत एकापेक्षा एक रेकॉर्ड तोडत आहे. मोठं मॅन्युफॅक्चरींग हब बनत आहे. याचं सर्व श्रेय्य युवकांना जातं. चांद्रयान, आदित्य आदित्य एल-१ चं यश जगासमोर आहे. येत्या काळात तरुणांनी असं काम करावं की येणाऱ्या पिढ्या नाव घेतील. इतिहास प्रत्येक वेळी एक संधी देतो. ती संधी आपल्याला अमृतकाळाच्या रुपाने मिळाली आहे. या काळात देशाला अजून पुढे न्यायचं आहे. याच काळात भारताचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल आणि भारताच्या तरुणावही याची जबाबदारी असून ते ही जबाबदारी स्वीकारतील अशी आशा मोदींनी व्यक्त केली.

आयुर्वेदाचं महत्त्व संपूर्ण जगाने मान्य केलं

आयुर्वेदाचं महत्त्व संपूर्ण जगाने मान्य केलं आहे. आपल्या पूर्वजांनी जतन केलेली ही उपचार पद्धती आज जगाला भारताची देण आहे. मात्र ब्रिटीशाच्या काळात आयुर्वेदाचं महत्त्व कमी झालं. वसाहतवादात ही उपचार पद्धती लोप पावत चालली होती. मात्र गेल्या दहा वर्षात तिला नवसंजीवनी मिळाली आहे.

महिलांचा सन्मान करा

नारीशक्तीचं देशातील योगदान कधीही विसरता येताणार नाही. आज तितकचं योगदान आहे. मात्र तिचा पदोपदी होणारा अपमान, मानहानी थांबली पाहिजे. लाल किल्ल्यावरून आपण यावर भाष्य केलं होतं. आज परत देशाला आवाहन करत आहे की महिलांचा सन्मान करा. त्यांना समाजात योग्य स्थान द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT