PM Narendra Modi  Saam Tv
देश विदेश

PM Narendra Modi: भाजप नेत्यांच्या सोशल मीडियावर यापुढे 'मोदी का परिवार' दिसणार नाही, काय आहे कारण?

Modi Ka Pariwar: पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपचे नेते आणि जनतेला आवाहन केले आहे की, आता सर्वजण त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून 'मोदी का परिवार' हे वाक्य काढू शकतात.

Pramod Subhash Jagtap

लोकसभा निवडणुकीदरम्यान (Loksabha Election 2024) भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी 'मोदी का परिवार' हे कॅम्पेन चालवले होते. याअंतर्गत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आपल्या नावापुढे 'मोदी का परिवार' असे लिहिले होते. पण आता त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून 'मोदी का परिवार' हे वाक्य निघणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आवाहन केले आहे की, आता सर्वजण त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून 'मोदी का परिवार' हे वाक्य काढू शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेत्यांच्या सोशल मीडियावरून आता 'मोदी का परिवार' हे वाक्य निघणार आहे. नरेंद्र मोदी यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत हे वाक्य काढण्याची विनंती केली आहे. पीएम नरेंद्र मोदींनी आपल्या एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'निवडणूक प्रचारादरम्यान भारतातील लोकांनी माझ्याबद्दल आपुलकीचे प्रतीक म्हणून त्यांच्या सोशल मीडियावर 'मोदी का परिवार' असे लिहिले होते. तुम्ही मोदी का परिवार हे लिहिल्यामुळे त्यातून मला बळ मिळाले. भारतीय जनतेने एनडीएला सलग तिसऱ्यांदा बहुमत दिले आहे. हा एक प्रकारचा विक्रम आहे आणि आपल्या देशाच्या भल्यासाठी काम करत राहण्याचा जनादेश दिला आहे.'

पीएम मोदींनी या पोस्टमध्ये पुढे असे देखील लिहिले की, 'आपण सर्व एक कुटुंब आहोत हा संदेश प्रभावीपणे पोहोचवल्यामुळे मी पुन्हा एकदा भारतातील नागरिकांचे आभार मानतो. तुम्हाला विनंती करतो की आपण आता आपल्या सोशल मीडिया वरून 'मोदी का परिवार' हे वाक्य काढून टाकू शकता. भारताच्या प्रगतीसाठी झटणारा एक परिवार या नात्याने आपला संबंध मजबूत आणि अतूट आहे.'

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने 'मैं मोदी का परिवार हूं' ही निवडणूक मोहीम सुरू केली होती. यासोबतच 'मोदी का परिवार' हे थीम साँगही लाँच करण्यात आले होते. आपल्या अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना पीएम मोदींनी माझा भारत, माझे कुटुंब असे लिहिले होते. यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचे बायो बदलत आपल्या नावामुळे 'मोदी का परिवार' असे लिहिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

horrific accident : स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात दुर्घटना; शाळेचं छत कोसळलं, एका मुलीचा मृत्यू

PF Withdrawal : नोकरी करतानाही पीएफचे पैसे काढता येतात! नियम आणि अटी जाणून घ्या

WhatsApp Banned: 'या' चुका आताच टाळा, नाहीतर तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट होईल बॅन

Maharashtra Live Update: शक्तीपीठासाठी मोजणी झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू - राजू शेट्टी

Matheran Traffic : सुट्टीचा आनंद कमी, मनस्तापच जास्त! माथेरान घाटात वाहतूक खोळंबा, पर्यटक लटकले

SCROLL FOR NEXT