आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना लागले आहे. सर्व नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. सर्व पक्षांतील नेत्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरु केल्याचेही दिसून येत आहे. याचदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप पक्षाच्या रणनीती आणि पक्षवाढी विषयी 'आज तक' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. (Latest Marathi News)
भाजपची दक्षिणेतील राज्यात सत्ता नाही. या राज्यात प्रादेशिक पक्षांची सत्ता आहे. याचा अर्थ भाजपचं वर्चस्व फक्त हिंदी पट्ट्यात आहे का? या प्रश्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोजक्या शब्दात उत्तर दिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'तुमचं आकलन चुकीचं आहे. भाजपची स्थापना होत असल्यापासून हे ऐकत आलो आहे. आमच्या पक्षाला कोणी ब्राह्मण आणि बनिया समाजाचा पक्ष म्हटलं. तर कधी आमचा पक्ष हिंदी पट्ट्यातील लोकांचा विचार करतो. भाजप शहरी पक्ष आहे, असं म्हणण्यात आलं. मात्र, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वकाही बदललं. निवडणुकीच्या निकालानंतर सर्व लेबल चुकीचे ठरले'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उदाहरण देत भाजपचं देशातील स्थान सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'देशातील असा कोणता कोपरा नाही, ज्या ठिकाणी भाजप पक्षाला समर्थन नाही. केरळमधील स्थानिक मुद्दे घेत पक्षातील पदाधिकारी जोरदार काम करत आहेत. बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडमध्ये आमचा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष आहे'.
'बिहारमध्ये आम्हाला लोकांचं समर्थन मिळालं होतं. सहा महिन्यापूर्वी कर्नाटकात आमचं सरकार होतं. पाँडिचेरीमध्ये तर आमचं सरकार आहे. आम्ही देशातील एकूण १७ राज्यात सत्तेवर आहोत. तर ८ राज्यात प्रमुख विरोधीपक्ष आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान पुढे म्हणाले, '२०१४ साली आमच्या ज्या भागातील राज्यात काहीच नव्हतो. त्याच ईशान्य भागातील ६ राज्यात आमचं सरकार आहे. यात नागालँड आणि मेघालय हे दोन्ही ख्रिश्चन बहुलराज्य आहेत. दक्षिण भारताविषयी म्हणायचं म्हटलं तर लोकसभेच्या दृष्टीकोनातून आमचाच पक्ष सर्वात मोठा आहे.
'१९८४ साली आमचे २ लोकसभा खासदार होते. तर आता आमचे ३०३ खासदार आहेत. आमच्या या राजकीय प्रवासाचा विचार करा. आमचं हे यश देशातील सर्व कानाकोपऱ्यातील लोकांच्या पाठिंब्याशिवाय शक्य आहे का? असा सवालही मोदी यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.