Pm Narendra Modi Meeting With Chiefs Three Armed Forces Saam Tv News
देश विदेश

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी मोठी घडामोड, तीनही सैन्यदलांच्या प्रमुखांसोबत बैठक; काहीतरी मोठं घडणार?

Pm Narendra Modi Meeting With Chiefs Three Armed Forces : पहलगाम हल्ल्यानंतर सातत्याने वरिष्ठ पातळीवरच्या बैठका घडताना दिसत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पंतप्रधान मोदींची भेट घेताना दिसत आहेत.

Prashant Patil

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट पसरली आहे. त्यातच आत्ता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडत असल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तीनही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत बैठक पार पडत आहे. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे देखील उपस्थित आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सीडीएस जनरल अनिल चौहान हे देखील बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर सातत्याने वरिष्ठ पातळीवरच्या बैठका घडताना दिसत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पंतप्रधान मोदींची भेट घेताना दिसत आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. पाकिस्तानात तीन दिवसांसाठी हवाई क्षेत्रावर देखील बंदी घालण्यात आली आहे. तसेच पाकिस्तान सैन्याने सीमेवर रणगाडे देखील आणले आहेत. पाकिस्तानात सुरु असलेल्या या हालचालींकडे भारतीय सैन्याचं अतिशय बारकाईनं लक्ष आहे. भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सीमेवर चोख तयारी करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आगामी काळात चार महत्त्वाच्या बैठकी होणार आहेत. भारताच्या सुरक्षेसंबंधित या महत्त्वाच्या बैठका असणार आहेत. यापैकी उद्या सकाळी ११ वाजता होणारी बैठक ही अत्यंत महत्त्वाची आहे. कॅबिनेट कमिटी ऑफ सेक्युरिटी म्हणजेच सीसीएसची बैठक उद्या सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या सुरक्षेसंबंधित निर्णय घेण्याबाबत ही अत्यंत उच्चस्तरीय समिती आहे. या समितीची उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याआधी पंतप्रधान मोदींनी तीनही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक बोलावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

SCROLL FOR NEXT