INS Vikrant Chhatrapati Shivaji Maharaj PM Narendra Modi News Update  SAAM TV
देश विदेश

PM मोदींनी INS विक्रांत छत्रपती शिवरायांना केली समर्पित; कारण आणि गौरवशाली इतिहास जाणून घ्या

भारताच्या समुद्री इतिहासातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे.

साम ब्युरो

INS Vikrant | कोची: भारताच्या समुद्री इतिहासातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आणि आतापर्यंतचं सर्वात मोठं जहाज आयएनएस विक्रांत (INS Vikrant) नौदलाच्या ताफ्यात दाखल झालं आहे. केरळच्या कोची येथे हा जलावतरण सोहळा पार पडला.

आयएनएस विक्रांत छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करत आहे, असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. तसेच यावेळी भारतीय नौदलाला नव्या ध्वजाच्या रुपात नवी ओळख मिळाली. यातील ब्रिटीश वसाहतवादाचा भूतकाळ आठवून देणारा क्रॉस कायमचा हटवण्यात आला आहे.

नौदलाचे (Indian Navy) नवे ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेच्या धर्तीवर आधारित आहे. नौदलाचं क्रिस्ट याच आकारात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाची प्रेरणा आहेत. छत्रपती शिवरायांना फादर ऑफ इंडियन नेव्ही किंवा नौदलाचे पितामह सुद्धा म्हटलं जातं. यामागे छत्रपती शिवरायांच्या मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास आहे.

मराठा शासनकाळात १७ व्या शतकात नौदल स्थापन केले होते. ते छत्रपती शिवरायांनी अधिक मजबूत केलं. समुद्री मार्गाला लागूनच असलेल्या कोकण आणि गोवा येथे देशाच्या संरक्षणासाठी एक मजबूत नौदलाची स्थापना केली. या समुद्री मार्गाने अरबी, पोर्तुगीज, ब्रिटीश आणि अन्य समुद्री लुटारूंनी घुसखोरी करू नये यासाठी त्यांनी मुंबईजवळील भिवंडी, कल्याण आणि पनवेलमध्ये युद्धनौकांची निर्मिती केली होती.

भारतीय नौदलानं प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांकडे जवळपास ६० युद्धनौका होत्या. शिवाजी महाराजांनी प्रशिक्षित तंत्रज्ज्ञांकडून या युद्धनौकांची निर्मिती करून घेतली होती. त्यांच्या आरमारात तब्बल ५ हजार सैन्य होते. इंग्रज, डच, पोर्तुगाल यांनी मराठा शासनकाळातील नौकांचा उल्लेख केला आहे. इंग्लिश फॅक्टरीच्या रेकॉर्डनुसार, त्यांच्या नौदलात ८५ फ्रिगेट म्हणजेच लहान युद्धनौका आणि तीन मोठ्या युद्धनौका होत्या.

सागरी ताकदीच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी असं नौदल उभारलं की त्याने शत्रूंची झोप उडवली. आज २ सप्टेंबर २०२२ या ऐतिहासिक तारखेला इतिहास बदलणारं आणखी एक काम झालं आहे. आज भारताने गुलामगिरीचं आणखी एक निशाण, गुलामगिरीचं ओझं मनावरून उतरवलं आहे. आजपासून भारतीय नौदलाला एक नवा ध्वज मिळाला आहे, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

आतापर्यंत भारतीय नौदलाच्या ध्वजावर गुलामगिरीची ओळख होती. मात्र, आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरित नौदलाचा नवा ध्वज समुद्र आणि आकाशात डौलाने फडकेल, असंही मोदी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मालाडमध्ये अग्नितांडव, १५ ते २० गाळ्यांना लागली आग

Shirdi Sai Sansthan: साई संस्थेच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत खळबळ, कारण काय? VIDEO

Cancer Signs: ७ लक्षणं दिसल्यास ९० दिवसांत डॉक्टरांकडे जा, कॅन्सर मूळापासून नष्ट होणार, वाचा तज्ज्ञांनी काय सांगितलं

Samruddhi Expressway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! दोन परदेशी नागरिकांचा जागीच मृत्यू|VIDEO

'बहिणीवर बलात्कार अन् आईला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त', माजी मंत्र्यांवर बायकोचे खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT