PM Narendra Modi Egypt Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच इजिप्त दौरा आहे. कैरो विमानतळावर इजिप्तच्या पंतप्रधानांनी मोदींचे स्वागत केले. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
तसेच या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'ऑर्डर ऑफ द नाईल' या इजिप्तच्या सर्वोच्च राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी (Egypt President Abdel Fattah al-Sisi) पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार दिला..
याबाबत अधिक माहिती अशी की, अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) इजिप्तमध्ये आहेत. यादरम्यान त्यांनी इजिप्तची राजधानी कैरो येथे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांची भेट घेतली. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींना इजिप्तचा सर्वात मोठा सन्मान देण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींना राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या हस्ते इजिप्तचा सर्वोच्च पुरस्कार 'ऑर्डर ऑफ द नाईल' (Order of the Nile) प्रदान करण्यात आला आहे. गेल्या नऊ वर्षांत पीएम मोदींना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. इजिप्शियन राज्य पुरस्कार हा जगातील विविध देशांनी पंतप्रधान मोदींना प्रदान केलेला 13 वा सर्वोच्च राज्य सन्मान आहे.
काय आहे ऑर्डर ऑफ द नाईल?
इजिप्तच्या सुलतान हुसेन कामेलने 1915 मध्ये देशासाठी उपयुक्त सेवा देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यासाठी ऑर्डर ऑफ द नाईल (किल्डात एल नील) ची स्थापना केली होती. 1953 मध्ये राजेशाही संपुष्टात येईपर्यंत हा इजिप्तच्या राज्याच्या प्रमुख आदेशांपैकी एक होता.
इजिप्त 1953 मध्ये प्रजासत्ताक बनल्यानंतर, त्याचा सर्वोच्च सन्मान, ऑर्डर ऑफ द नाईलची पुनर्रचना करण्यात आली. ऑर्डर ऑफ द नाईल हा शुद्ध सोन्याचा कॉलर आहे ज्यामध्ये तीन चौरस सोन्याचे तुकडे आहेत ज्यात फारोनिक चिन्ह आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.