Rain News Update : यंदा दुष्काळ नाही तर मुलबक पाऊस, पंजाबराव डख यांचा अंदाज, शेतकऱ्यांना दिला मोलाचा सल्ला

Monsoon 2023 : राज्यात यंदा दुष्काळ नाही तर मुलबक पाऊस होणार असल्याचा दावा हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केला आहे.
Rain News
Rain News Saam Tv
Published On

Pune News : जून महिन्याच्या अगदी शेवटी मान्सूनने अनेक जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लांबलेल्या पेरण्या आता होणार आहेत. पावसाचं आगमन उशीरा झालं आहे, मात्र पावसाचं प्रमाण आता कसं असेल याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. दरम्यान शेतकऱ्यांसाठी खूशखबर आहे.

राज्यात यंदा दुष्काळ नाही, तर मुलबक पाऊस होणार असल्याचा दावा हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केला आहे. आजपासून राज्यात मान्सूनचे आगमन झालं आहे. मात्र पश्चिमेकडून येणारा पाऊस हा काही भागांमध्ये स्थिरावत नसून पूर्वीकडून येणाऱ्या पाऊसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

Rain News
Mumbai Rain Update: मुंबईला पावसानं झोडपलं; १०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद; ऑरेंज अलर्ट जारी

शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

त्यामुळे यंदा पूर्वेकडून येणारा पाऊसच राज्यात स्थिरावणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी साम टीव्हीशी बोलताना दिला आहे. सात इंच जमिनीत ओल तयार झाल्यानंतरच पेरणी करावी, असा सल्लाही पंजाबराव डख यांनी दिला आहे. (Latest News Marathi)

Rain News
Eknath Shinde News: अंमलबजावणी होणार नाही, तिथे कारवाई करू; कोस्टल रोडच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

पावसाची सद्यस्थिती

पालघर, ठाणे आणि मुंबईला २५ ते २८ जूनपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर रायगड आणि रत्नागिरीमध्ये २५ ते २८ जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आलाय. नंदुरबार आणि डहाणू या शहरांमध्ये तुरळक पावसाच्या सरी बरसत आहेत. येथे पुढचे ५ दिवस ग्रीन अलर्ट जारी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com