PM Narendra Modi Speech : Saam tv
देश विदेश

PM Narendra Modi Speech : कामगार, दलित, कोरोना काळ, सैनिक...; लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले? VIDEO

narendra modi Speech : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना संबोधि केलं. यावेळी त्यांनी देशातील बदलाविषयी भाष्य केलं. अनेक राबवलेल्या योजनेविषयी माहिती दिली.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : आज देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन आहे. या दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ११ व्यांदा तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशाला संबोधित करण्यास सुरुवात केली. यावेळी देशाप्रति लढलेल्या, बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच स्वातंत्र्य लढ्यासाठी आयुष्य वेचणाऱ्यांना नमन मोदींनी केलं. तसेच देशभरातील राबवलेल्या अनेक योजनेविषयी माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे

विकसित भारत २०४७ वर्ष हे फक्त शब्द नाहीत. यामागे कठोर परिश्रम आहेत. देशातील कोट्यवधी लोकांच्या सूचना ऐकल्या जात आहेत. माझ्या देशातील लोकांनी असंख्य सूचना दिल्या आहेत. प्रत्येक लोकांचं स्वप्न त्यात दिसत आहे. गावातील लोक, शहरी लोक, शेतकरी, कामगार, दलित, जंगलात राहणाऱ्या लोकांनी अनेक सूचना दिल्या आहेत.

काही लोकांनी म्हटलं की, भारतात कौशल्य भांडवल तयार केलं पाहिजे. विद्यापीठ ग्लोबल करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. जगभरातील लोकांनी भारताच्या कौशल्यवान तरुणांना प्रथम पसंती दिली पाहिजे.

देशातील मोठ्या शेतकऱ्यांसहित छोट्या शेतकऱ्यांना हातभार लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेकांनी न्यायव्यवस्थेत बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाढत्या नैसर्गिक संकटावर मात कशी करता येईल, याविषयी सूचना दिल्या आहेत. भारताची पारंपरिक औषधे हे वेलनेस हबच्या रुपात विकसित करायलं हवा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था तयारी करायची आहे. देशातील सामान्य नागरिकांनी विविध सूचना दिल्या आहेत. देशातील लोकांचे हे स्वप्न आहेत. यामुळे आमचा आत्मविश्वास दुणावतो. त्यांचा विश्वास अनुभवातून आला आहे. देशातील खेडापाड्यात वीज पोहोचते, तेव्हा विश्वास निर्माण होतो. जेव्हा स्वच्छ भारताविषयी बोललं जातं, त्यावेळी गरीब वस्तीतही स्वच्छतेविषयी चर्चा होते. हे नव्या भारताचं प्रतिबिंब आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी लोकांना पाणी पोहोचत आहे. या योजनेतून वंचितांना पाणी मिळत आहे. माझे गरीब भाऊ-बहीण वंचित होते. अशा योजनेतून त्यांना फायदा होत आहे. भारताने उर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी काम केलं आहे. कोरोना काळ विसरू शकत नाही. कोरोना लसी जगभरात पोहोचवल्या. आपण दहशतवांद्यावर एअर स्ट्राइक करतो, तेव्हा अभिमान वाटतो. आपण सैन्याला सामर्थ्य दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT