Navneet Rana News: न्यायव्यवस्था म्हणजे गंमत नव्हे, राणा दाम्पत्याला कोर्टानं झापलं; दिला शेवटचा अल्टिमेटम

मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणी आज होणाऱ्या सुनावणीला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आजही गैरहजर होते.
Navneet Rana News
Navneet Rana NewsSaam TV
Published On

Maharashtra Political News: हनुमान चालीसा प्रकरणातील आरोपातून दोषमुक्त करण्यासाठी राणा दाम्पत्यातर्फे मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर आज होणाऱ्या सुनावणीला राणा दाम्पत्य गैरहरजर राहिलेत. त्यावरुन कोर्टाने त्यांना न्यायव्यवस्था म्हणजे गंमत नव्हे, अशा शब्दांत फटकारलं आहे. तसेच अखेरची संधी दिलीये. (Latest Marathi News)

मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणी आज होणाऱ्या सुनावणीला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आजही गैरहजर होते. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी याबाबत गंभीर दखल घेतली आहे. "लोकसभा अधिवेशनामुळे नवनीत राणा यांची गैरहजेरी समजू शकतो, पण रवी राणा गैरहजर का ?,असा प्रश्न न्यायाधीश राहुल रोकडे यांनी विचारला आहे.

Navneet Rana News
Navneet Rana On Manipur Violence Case : मणिपूरमधील त्या घटनेनंतर लोकसभेत नवनीत राणा आक्रमक...

विशेष म्हणजे राणा यांचे वकील रिझवान मर्चंट हे देखील गैरहजर आणि सरकारी वकील सुमेर पंजवानी गैरहजर राहिले. तसेच केस तपासाधिकारी सिक लिव्हवर होते. त्यामुळे राणा दाम्पत्याला कोर्टाने फटकारलं आहे. न्यायव्यवस्था म्हणजे गंमत नव्हे, असं म्हणत नवनीत आणी रवी राणा यांना कोर्टानं अखेरची संधी दिली असून दोघांनाही २८ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा म्हणू असं म्हटलं होतं. त्यावेळी राज्याचं राजकारण चांगलंच तापलं. पुढे राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दाखल केलेल्या गुन्ह्यातून आरोप मुक्तीसाठी राणा दाम्पत्यातर्फे मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. यावरील सुनावणीला आज राणा दांपत्य गैरहजर राहिले.

Navneet Rana News
Mla Ravi Rana Threat: आमदार रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी; राजपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com