PM Narendra Modi In Parliament Saam tv
देश विदेश

PM Narendra Modi In Parliament: 'विरोधकांना सिक्रेट वरदान मिळालंय'; PM मोदींनी उदाहरण देत घेतली विरोधकांची फिरकी

No Confidence Motion : 'विरोधकांचा वरदान हा आहे की, हे लोक ज्यांचा वाईट विचार करतात, मात्र, त्यांचं चांगलं होतं, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांची फिरकी घेतली.

Vishal Gangurde

PM Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेत अविश्वास प्रस्तावावर बोलत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 'विरोधकांना सिक्रेट वरदान मिळालं आहे. वरदान हे आहे की, हे लोक ज्यांचा वाईट विचार करतात, मात्र, त्यांचं चांगलं होतं, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांची फिरकी घेतली. (latest Marathi news)

अविश्वास प्रस्तावावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'विरोधकांचा प्रिय नारा कोणता आहे तर, मोदी तेरी कब्र खुदेगी. यांचा हा आवडीचा नारा आहे. मी शिव्या, अपशब्द, असंसदीय भाषेचंही टॉनिक बनवतो. हे असे का करतात? मी संसदेत सिक्रेट सांगू इच्छितो की, माझा विश्वास झाला आहे की, विरोधकांना सिक्रेट वरदान मिळालं आहे. वरदान हे आहे की, विरोधक ज्यांचा वाईट विचार करतात, त्यांचं चांगलं होतं. त्यांचं उदाहरण तुमच्यासमोर आहे'.

'विरोधकांमुळे माझंही भलं होत गेलं. तीन उदाहरणातून हे सिद्ध करू शकतो. काहींनी सांगितलं होतं की, बँकिग क्षेत्र बुडणार आहे. देश बर्बाद होणार असं बरंच काही सांगितलं होतं. परदेशी विद्वानांना भारतात घेऊन येत होते. कारण त्यांचं कोणी नाही ऐकलं, तर त्यांचं तरी ऐकतील. यांनी बँकिंग क्षेत्राकडे वाईट होण्याच्या दृष्टीने बघितलं, परंतु नफा दुप्पट झाला, असे ते म्हणाले.

'एनपीएचा अडथळाही आम्ही दूर केला. एचएएलविषयी अनेक वाईट गोष्टी विरोधकांनी बोलल्या. खूप नुकसान होणार, अशी भाषा केली. एचएएलचा नाश झाला आहे, असंही बोलले. संरक्षण क्षेत्राचा उद्योग संपला असं म्हटलं गेलं. एचएएलच्या दरवाजात कामगार जमल्यानंतर त्यांचा व्हिडिओ बनवण्यात आला. कामगारांना सांगितलं की, तुमचं काहीच भविष्य नाही. मात्र, कर्मचाऱ्यांची माथी भडकावूनही एचएएल देशाची शान होत आहे, असेही ते म्हणाले.

तिसरं उदारण सांगतो. एलआयसीबद्दलही वाईट बोललं गेलं. मात्र, एलआयसीची प्रगती होत आहे. शेअर मार्केटची आवड असणाऱ्यांना एक मंत्र आहे, सरकारी कंपन्यांवर पैसे लावा, नफा होईल. विरोधक देशातील ज्या संस्थेच्या मृत्यूची घोषणा करतात, त्या संस्थेचं नशीब उजळतं'. (Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT