पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील पहिले असे नेते ठरले आहेत, त्यांनी यूट्यूबवर 2 कोटी सब्सक्राइबर्सचा टप्पा ओलांडला आहे. यूट्यूबवरील सब्सक्राइबर आणि व्ह्यूजच्या बाबतीत पंतप्रधान मोदींनी जगातील सर्व प्रतिस्पर्धी नेत्यांना मागे टाकले आहे. मोदींच्या यूट्यूब चॅनलला एकूण 450 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मोदींच्या चॅनलच्या ग्राहकांच्या संख्येने 1 कोटीचा टप्पा ओलांडला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चॅनलवरील तीन सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओंना एकूण 175 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. मोदींनंतर दुसरे ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो आहेत. ज्यांचे त्यांच्या चॅनलवर 64 लाख सब्सक्राइबर्स आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की 11 लाख सब्सक्राइबर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चौथ्या क्रमांकावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आहेत. ज्यांचे यूट्यूब चॅनलवर 7,94,000 सब्सक्राइबर्स आहेत. डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान मोदींच्या चॅनलचे एकूण व्ह्यूज 22.4 कोटी होते, जो एक रेकॉर्ड आहे. (Latest Marathi News)
यूट्यूब व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे देखील जनतेशी सक्रियपणे जोडलेले आहेत. येथे ही मोठ्या प्रमाणात लोक त्यांना फॉलो करतात. ते नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेअर करत असतात.
या नेत्यांचेही आहेत मिलियनमध्ये सब्सक्राइबर
मेक्सिकोचे अध्यक्ष ओब्राडोर - 4.12M सब्सक्राइबर्स
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन - ‧794K सब्सक्राइबर्स
इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मॅलोनी - 149K सब्सक्राइबर्स
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.