PM Modi 
देश विदेश

PM Modi : पंतप्रधान मोदींच्या विमानाचे हायवेवर एमर्जन्सी लँडिंग, पण कारण काय? पाहा थरारक Video

Narendra Modi, Assam highway landing : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसाम दौऱ्यात दिब्रुगडजवळ राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालीन लँडिंग स्ट्रिपचे उद्घाटन करण्यात आले. हायवेवर विमान उतरल्याचा थरारक क्षण पाहा आणि या सुविधेचे महत्त्व जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

PM Modi Lands Aircraft on Assam Highway During Emergency Airstrip Inauguration : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाचे हायवेवरच लँडिंग करण्यात आले. थांबा, घाबरू नका.. नेमकं प्रकरण अन् कारण जाणून घेऊयात.. झालं असं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम राज्याच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी आसाममधील दिब्रुगड राष्ट्रीय महामार्गावर ईशान्येकडील पहिल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदी लॉकहीड सी-१३० हरक्यूलिस विमानातून महामार्गावर उतरले. हायवेवरील लँडिंगचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील आपत्कालीन लँडिंग सुविधेचे उद्घाटन केले. भारतीय हवाई दलाची विमाने येथून उड्डाण करत आहेत. यामध्ये लढाऊ विमाने, वाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टरचा समावेश आहे. दिब्रुगडपासून भारत-चीन सीमेपर्यंतचे सर्वात जवळचे अंतर अंदाजे २५०-३०० किलोमीटर आहे.

पाहा व्हिडिओ

मोदींचे विमान राष्ट्रीय महामार्ग-३७ वर उतरले

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आसाम दौऱ्यावर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. आपत्कालीन लँडिंगबाबत त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, "इमर्जन्सी लँडिंग सुविधेचे उद्घाटन पंतप्रधान मोदी १४ फेब्रुवारी रोजी करतील. चाचणी टप्प्यापासून ते यशस्वी ऑपरेशन्सपर्यंत, कनेक्टिव्हिटी आणि धोरणात्मक ताकदीचा हा एक नवीन अध्याय आहे."

पंतप्रधान आसाम दौऱ्यावर -

आज दुपारी एक वाजता पंतप्रधान ब्रह्मपुत्रा नदीवरील कुमार भास्कर वर्मा सेतूला भेट देतील. त्यानंतर, दुपारी 1:30 वाजता, पंतप्रधान गुवाहाटीतील लाचित घाट येथे 5,450 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि त्यांना हिरवा झेंडा दाखवतील. पंतप्रधान दळणवळणाची गती वाढविणे, डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करणे, उच्च शिक्षणाला चालना देणे आणि सार्वजनिक वाहतूकीला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने विकसित केलेल्या अनेक प्रमुख प्रकल्पांचे उद्घाटन करतील, ज्यामुळे ईशान्येकडील प्रदेशातील विकासाला लक्षणीय चालना मिळेल. सुमारे 3,030 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या ब्रह्मपुत्रा नदीवरील कुमार भास्कर वर्मा सेतूचे उद्घाटन पंतप्रधान करतील.हा एक सहापदरी (6-लेनचा) एक्स्ट्राडोज्ड प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट (पीएससी) पूल गुवाहाटीच्या भागांना उत्तर गुवाहाटीशी जोडतो आणि ईशान्य भारतातील पहिला एक्स्ट्राडोज्ड पूल आहे. यामुळे गुवाहाटी-उत्तर गुवाहाटी दरम्यानचा प्रवास वेळ 7 मिनिटांपर्यंत कमी होईल. पंतप्रधान पीएम-ईबस सेवा योजनेअंतर्गत या गुवाहाटी (100), नागपूर (50), भावनगर (50) आणि चंदीगड (25) चार शहरांमधील येथे 225 इलेक्ट्रिक बसेसना हिरवा झेंडा दाखवतील. या चार शहरांमध्ये पीएम-ईबस सेवा योजनेअंतर्गत ई-बस सेवा सुरू झाल्यामुळे, 50 लाखांहून अधिक नागरिकांना स्वच्छ, परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवांचा लाभ मिळेल तसेच शहरी गतिमानता वाढून जीवनमान सुधारेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

Maharashtra News Live Update: बनेश्वर क्षेत्रातील मधमाशांचा वाढता धुमाकूळ, भाविकांच्या जीवितास धोका

ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी होणार; मोदी सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय

कृषिप्रधान देशाचा कणा अक्षरशः रडला! कांद्याला भाव किलोला फक्त ५० पैसे, ७३ पोती विकली, हातात आले ४०० रुपये

Kidney health: तुमच्या दररोजच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी!

SCROLL FOR NEXT