काँग्रेसला सबका साथ, सबका विकास काँग्रेसला कधीच कळणार नाही, ते त्यांच्या विचाराच्या पलीकडे आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलाय. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरूय. पंतप्रधान मोदींनी आज राज्यसभेत धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं.
यावेळी मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या मॉडेलमध्ये फक्त कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं. पण आमच्या मॉडेलमध्ये देशाला प्राधान्य दिले जातं, अशी टीका पीएम मोदी यांनी केली.
काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ओबीसींचा सन्मान आणि आदर आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. देशात जेव्हा-जेव्हा आरक्षणाचा मुद्दा आला, तेव्हा काँग्रेसने त्याला योग्य पद्धतीने सामोरे जाण्याचा कोणताही प्रयत्न केला नाहीये. आमच्या सरकारने पहिल्यांदाच सर्वसामान्य प्रवर्गातील गरिबांना १० टक्के आरक्षण दिलं. हे कोणाकडूनही हिसकावून न घेता दिले. एससी-एसटी, ओबीसींनीही त्याचे स्वागत केलं.
आरक्षणाबाबत बोलताना मोदी म्हणाले, आपल्या देशात दिव्यांगांचे कधीच ऐकून घेतले गेलं नाही. पण आमच्या सरकारने दिव्यांगांच्या आरक्षणाचा विस्तार केला. त्यांच्या योजना तयार त्या अंमलातही आणल्या. तसेच ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कांबाबत प्रयत्न केलेत. आम्ही 'सबका साथ, सबका विकास हा मंत्र आम्ही सत्यात उतरवला. पण काँग्रेसला याचा अर्थ कधीच समजणार नाही', असा टोला पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला लगावला.
काँग्रेस मतांचं राजकारण करत होते. निवडणुका आल्या की छोट्या वर्गाला काहीतरी द्यायचे आणि नंतर काहीच द्यायचं नाही, अशी काँग्रेसची पद्धत होती. पण भाजपच्या सरकारने २०१४ मध्ये देशाला पर्यायी आणि समाधानाचे मॉडेल दिलं आहे, तुष्टीकरणाचे नाही, असंही मोदी यावेळी म्हणाले. भारताकडे जे काही संसाधने आहेत, त्यांचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न आहे.
एससी-एसटीचा कायदा मजबूत करण्यासाठी आमच्या सरकारने दलित-आदिवासी समाजाप्रती आदर आणि बांधिलकी दाखवली. तर काँग्रेसकडून आता जातीवादाचे विष पसरवण्याचे प्रयत्न केले जाताहेत, अशी टीकाही पंतप्रधान मोदींनी केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.