PM Modi Salary Saam Tv
देश विदेश

PM Modi Salary: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पगार किती? घर कुठे? कोणत्या सुविधा मिळतात? वाचा सविस्तर

PM Narendra Modi Salary: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पगार किती असतो असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. त्यांना सरकारकडून अनेक सुविधादेखील मिळतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंतप्रधान मोदी यांचा उद्या वाढदिवास

पंतप्रधान मोदी यांचा पगार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळणाऱ्या सुविधा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घर

सेवानिवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या आपला वाढदिवस साजरा करणार आहे. नरेंद्र मोदी यांचा ७५वा वाढदिवस आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहे. नरेंद्र मोदी यांना पगार किती मिळतो असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पगार (PM Narendra Modi Salary)

मिडिया रिपोर्टनुसार, नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना १.६६ लाख रुपये पगार दर महिन्याला मिळतो. यामध्ये बेसिक पे ५०,००० रुपये असतो. सरकारी भत्ता ३००० रुपये, संसदीय भत्ता ४५,००० आणि दैनिक भत्ता हा २००० रुपये असतो.

सुविधा (PM Narendra Modi Get These Facillities)

पंतप्रधान नरेंद्र मोदींना याचसोबत अनेक सुविधादेखील मिळतात. त्यांना चौवीस तास एसपीजी म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपद्वारे सुरक्षा पुरवली जाते. त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा वाहने आणि उपकरणेदेखील असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशात किंवा परदेशात प्रवास करताना सरकारी विमाने, हेलिकॉप्टर आणि स्पेशल वाहने वापरण्याचा अधिकार असतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्व वैद्यकीय सुविधा मोफत दिल्या आहे. यामध्ये सरकारी आणि खाजगी रुग्णालयातील खर्चाचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदींचे घर (PM Modi House)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे घर ७ लोककल्याण मार्ग येथे आहे. त्यांचे आलिशान निवासस्थान आहे. या घरात अनेक आधुनिक सुविधा आहेत.

पेन्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवृत्तीनंतर पेन्शनदेखील मिळते. त्यांनी केलेल्या कार्याकाळाच्या आधारावर ही पेन्शनची रक्कम अवलंबून असते. नरेंद्र मोदींचा आंतरराष्ट्रीय प्रवास खर्च हा सरकार उचलते. यामध्ये प्रवास, राहण्याची, खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था असते. पंतप्रधान मोदींना त्यांच्या कामासाठी एक टीम दिली जाते. यामध्ये त्यांना पर्सनल सहाय्यक, सल्लागार आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पद सोडल्यानंतरही त्यांना पाच वर्षासाठी मोफत निवास स्थान, वीज, पाणी, सुरक्षेची सुविधा मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sai Tamhankar: लालछडी...! सईचा हटके अंदाज, Photo पाहतच राहाल

Actress Vannu The Great : लग्नासाठी धर्मांतर केलं, नवरा संसार अर्ध्यात सोडून पळाला; अभिनेत्री रडून रडून बेहाल

Crime News : जमिनीच्या वादातून अपहरण करत हत्या; शहापूर तालुक्यातील घटनेने खळबळ

Prajakta Koli: सोशल मिडीया स्टार प्राजक्ता कोळीची मराठीत एन्ट्री; 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम'मध्ये साकारणार खास भूमिका

Maharashtra Live News Update: सरकारने काढलेला जीआर वादग्रस्त - छगन भुजबळ

SCROLL FOR NEXT