Free Ganpati Special Modi Express: कोकणकरांसाठी मोफत मोदी एक्स्प्रेस रवाना, गणेशोत्सवासाठी दोन विशेष गाड्यांची सोय|VIDEO

Nitesh Rane Launches Two Ganpati Special Trains: गणपती उत्सवानिमित्त कोकणकरांसाठी नितेश राणे यांनी मोफत मोदी एक्स्प्रेस गाड्यांचे लोकार्पण केले. १३ व्या वर्षी दोन विशेष गाड्या सोडल्या असून प्रवाशांसाठी मोफत जेवण व पाण्याची सोय करण्यात आली आहे.
Summary

नितेश राणे यांनी १३ व्या वर्षी मोदी एक्स्प्रेस गणपती स्पेशल गाडी सोडली.

यंदा कोकणकरांसाठी दोन विशेष ट्रेन सोडण्यात आल्या आहेत.

प्रवाशांसाठी मोफत जेवण आणि पाण्याची सोय उपलब्ध.

कोकणवासीयांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

गणपती उत्सव निमित्ताने मुंबई आणि मुंबई परिसरातील चकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मोदी एक्सप्रेस गणपती स्पेशल ट्रेन आज सोडण्यात आली. कोकणवासीयांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी ठरली. महत्वाचे म्हणजे हे 13 वे वर्ष असून यावेळी कोकणवासीयांसाठी विशेष दोन ट्रेन सज्ज झाल्या.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कोकणातील लोकांनी महायुतीला भरभरून मतदान केले. तसेच कणकवली, देवगड आणि वैभववाडीच्या जनतेने तिसऱ्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे यावर्षी कोकणवासीयांच्या सेवेसाठी 2 विशेष ट्रेन सोडल्या आणि यामध्ये सर्व प्रवासी आणि भक्तांसाठी मोफत जेवण आणि पाण्याची व्यवस्था असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com