Pm Narendra Modi and Vladimir Putin Saam TV
देश विदेश

PM Modi Russia Visit: PM मोदी जुलैमध्ये रशियाच्या दौऱ्यावर, पुतिन यांच्यासोबत या मुद्द्यांवर होणार चर्चा

Russia PM and India PM Meet: पंतप्रधान नरेंद्र मोदी 8-9 जुलै रोजी रशियाच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय शिखर बैठक घेणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील महिन्यात दोन दिवसीय रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. पंतप्रधान मोदी हे 8 आणि 9 जुलै रोजी रशियाला भेट देणार आहेत. यावेळी ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय शिखर बैठक घेणार आहेत. या बैठकीत तेल, द्विपक्षीय संबंध, युक्रेन- रशिया युद्ध यासोबत अनेक मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते.

तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच रशिया दौरा असेल. याआधी पंतप्रधान मोदी हे 2019 मध्ये रशिया दौऱ्यावर गेले होते. जेव्हा ते 20 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी व्लादिवोस्तोक येथे गेले होते.

या दौऱ्याबद्दल माहिती देताना रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे सहाय्यक युरी उशाकोव्ह म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या रशिया दौऱ्याची तयारी सुरू आहे. आम्ही अद्याप तारीख सांगू शकत नाही. भारतानेही याला दुजोरा दिलेला नाही.

भारत आणि रशिया दरम्यान वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषद 2000 मध्ये सुरू झाली. त्याच धर्तीवर पंतप्रधान मोदी रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. आतापर्यंत भारत आणि रशियामध्ये 21 वार्षिक शिखर परिषदा आळीपाळीने झाल्या आहेत. 21 वी शिखर परिषद डिसेंबर 2021 मध्ये नवी दिल्ली येथे झाली.

तेव्हापासू द्विपक्षीय सहकार्यावरील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी मोदी आणि पुतिन यांनी किमान 10 वेळा फोनवरून संवाद साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reshma Shinde : अभिनेत्री रेश्मा शिंदे आई तुळजाभवानीच्या दर्शनाला, पाहा फोटो

दारूच्या नशेत तरुण थेट रेल्वे ट्रॅकवर झोपला, ट्रॅकमनने वेळीच बाहेर खेचलं; कर्मचारी रविकुमार यांचं सर्वत्र कौतुक

Chhatrapati Sambhaji nagar : मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुल सचिवाचा आत्महत्येचा प्रयत्न; चिठ्ठीत २ बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये तरुणाने दुकानातील मोबाईल फोडले, EMIवर मोबाईल न दिल्याच्या रागातून कृत्य

Shocking News : दिरासोबतच्या प्रेम प्रकरणात पती अडसर, कुख्ख्यात शुटरकडून नवऱ्यावर गोळी चालवली; पुढे जे घडलं ते भयंकर...

SCROLL FOR NEXT