PM Modi will distribute government job appointment latter to 51 thousand youths of the india today in Rozgar Mela Saam TV
देश विदेश

Rozgar Mela: पंतप्रधान मोदींकडून ५१ हजार तरुणांना मोठं गिफ्ट; आज सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्र देणार

PM Rozgar Mela: पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील तरुणांना सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र देणार आहे. दुपारी १ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे नियुक्तीपत्रक दिलं जाणार आहे.

Satish Daud

PM Rozgar Mela

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील तरुणांना सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र देणार आहे. दुपारी १ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे नियुक्तीपत्रक दिलं जाणार आहे. याचा लाभ देशभरातील ५१ हजार तरुणांना होणार आहे. दिवाळीपूर्वी मोदी सरकारकडून मिळालेलं हे मोठं गिफ्ट असणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाढती बेरोजगारी लक्षात घेता केंद्र सरकारकडून (Central Government) आज देशातील ३७ ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्रक देण्यात येणार आहे. नियुक्ती झालेल्या तरुणांना केंद्र सरकार तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विविध विभागांमध्ये नोकरी दिली जाणार आहे.

दरम्यान, देशभरातून निवड झालेले नवनियुक्त कर्मचारी हे रेल्वे मंत्रालय, पोस्ट विभाग, गृह मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य मंत्रालय यासारख्या सरकारच्या विविध विभागांतून आलेले आहेत. रोजगार मेळावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेसाठी एक मोठे पाऊल आहे.

नियुक्त केल्या जाणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांना iGOT कर्मयोगी पोर्टलवर कर्मयोगी प्रारंभ या ऑनलाइन मॉड्यूलद्वारे स्वतःला प्रशिक्षण देण्याची संधी मिळेल. ७५० हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे कर्मचारी कुठूनही आणि कोणत्याही उपकरणाद्वारे त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतात.

लोकसभा २०२४ निवडणुकीपूर्वी देशातील १० लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्या जातील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. जून २०२२ मध्ये मोदींनी स्वतः सर्व सरकारी मंत्रालये आणि विभागांमधील रिक्त पदांचा आढावा घेतला होता. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली होती. आता रोजगार मेळाव्या अंतर्गत मोदी सरकारकडून बेरोजगारांना नोकऱ्या देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

SCROLL FOR NEXT