PM Modi Will Celebrates Diwali with Soldiers Saam Tv
देश विदेश

Diwali 2023: PM मोदी जवानांसोबत साजरी करणार दिवाळी, जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये सैन्यसोबत करणार सेलिब्रेशन?

PM Modi News: PM मोदी जवानांसोबत साजरी करणार दिवाळी, जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये सैन्यसोबत करणार सेलिब्रेशन?

Satish Kengar

PM Modi Will Celebrates Diwali with Soldiers:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळीही सैनिकांसोबत साजरी करू शकतात. पंतप्रधान मोदी जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान मोदी सैनिकांसोबत दिवाळीचा सण साजरा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही दिवाळीच्या मुहूर्तावर ते कारगिलला पोहोचले होते, तिथे त्यांनी भारतीय लष्कराच्या जवानांसोबत दीपोत्सव साजरा केला होता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तत्पूर्वी, 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना या दिवाळीत स्थानिक पातळीवर उत्पादित उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले होते. तसेच त्या उत्पादनाशी किंवा त्याच्या निर्मात्यासोबत 'नमो अॅप'वर सेल्फी शेअर करा, असंही ते म्हणाले होते. पंतप्रधान मोदींनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले होते की, "या दिवाळीत आपण नमो अॅपवर #Vocal for Local सह भारताची उद्योजकता आणि सर्जनशीलता साजरी करूया."  (Latest Marathi News)

ते म्हणाले होते की, “स्थानिक पातळीवर बनवलेली उत्पादने खरेदी करा आणि नंतर नमो अॅपवर उत्पादन किंवा निर्मात्यासोबत सेल्फी शेअर करा. तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना यामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करा आणि सकारात्मकता पसरवण्याचं आवाहन करा.''

पंतप्रधान मोदी म्हणाले, "स्थानिक प्रतिभेला पाठिंबा देण्यासाठी, आपल्या सहकारी भारतीयांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपल्या परंपरा समृद्ध ठेवण्यासाठी आपण डिजिटल मीडियाच्या सामर्थ्याचा वापर करूया."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

SCROLL FOR NEXT