'श्री काशी विश्वनाथ धाम'चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन... Saam Tv
देश विदेश

'श्री काशी विश्वनाथ धाम'चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन...

काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्यातील इमारतींचे उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. 339 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

वृत्तसंस्था

संतोष शाळीग्राम, नवी दिल्ली

वाराणसी, उत्तर प्रदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१३ डिसेंबर) वाराणसीला भेट देणार आहेत. 13 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास पंतप्रधान मोदी (PM Modi) श्री काशी विश्वनाथाच्या मंदिरात (Shri Kashi Vishwanath Temple) जाऊन पूजा-अर्चना करतील आणि त्यानंतर ते काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्यातील इमारतींचे उद्घाटन करतील. सुमारे 339 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. (PM Modi to inaugurate 'Shri Kashi Vishwanath Dham' today)

हे देखील पहा -

वाराणसी (Varanasi) दौऱ्यादरम्यान पंतप्रधान 13 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता कालभैरव मंदिराला (Kalbhairav Temple Varanasi) भेट देतील आणि 13 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता रो-रो जहाजातून गंगा आरतीसाठी उपस्थित होतील. 14 डिसेंबरला दुपारी 3:30 वाजता मोदी हे वाराणसीतील स्वरवेद महामंदिर येथे सदगुरु सदाफलदेव विहंगम योग संस्थानच्या 98 व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. दोन दिवसांच्या दौऱ्यात मोदी आसाम, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा,  हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि बिहार आणि नागालँडच्या उपमुख्यमंत्र्यांचा सहभाग असलेल्या परिषदेत सहभागी होणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Cleaning Tips: लादी पुसताना पाण्यात टाका मीठ, नकारात्मक ऊर्जा होईल दूर

Bribe Case : गॅस एजन्सीवर कारवाई टाळण्यासाठी पावणेदोन लाखांची लाच; मुख्य निरीक्षण अधिकारी एसीबीच्या ताब्यात

Early signs of gastric cancer: पोटात कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी होतात 'हे' बदल; लक्षणं दिसताच डॉक्टरांची मदत घ्या

सेक्सटॉर्शन, डिजिटल अरेस्ट.. मुंबईकरांनी १५ महिन्यात गमावले ११२७ कोटी रूपये

Tax Saving Tips : करदात्यांच्या कामाची बातमी! टॅक्स वाचवण्याचे ५ मार्ग, ITR फाइल करण्याआधी नोट करा

SCROLL FOR NEXT