PM Modi  Saam Tv
देश विदेश

PM Modi : नेहरूंनी 'वंदे मातरम्'लाच विरोध केला, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आक्रमक भाषण, इंदिरा गांधींवर साधला निशाणा

PM Modi on Vande Mataram : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांनिमित्त भाषण करताना नेहरू आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. जिनांनी वंदे मातरमला विरोध केला असताना नेहरूंनी माघार घेतल्याचा आरोप केला.

Namdeo Kumbhar

  • ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण झाल्याने संसदेत विशेष चर्चा आयोजित करण्यात आली.

  • पंतप्रधान मोदींनी नेहरू आणि काँग्रेसवर ऐतिहासिक निर्णयांवरून हल्लाबोल केला.

  • जिना यांनी विरोध केला तेव्हा नेहरूं मुस्लिम लीगसमोर झुकल्याचा आरोप मोदींनी केला.

  • १९७५ च्या आणीबाणी काळाचा उल्लेख करून इंदिरा गांधींवर निशाणा साधला.

PM Modi Addresses Parliament on 150 Years of ‘Vande Mataram’ : जिनांचा विरोध धुडकावण्याऐवजी नेहरू यांनी 'वंदे मातरम्'लाच विरोध केला. नेहरूंनी मुस्लीम लीगसमोर गुडघे टेकले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केला. 'वंदे मातरम्' या गीताला १५० वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने संसदेत चर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या शतकात 'वंदे मातरम्'चा विश्वासघात झाला. ते वादात ओढले गेले. मुस्लिम लीगने 'वंदे मातरम्'ला विरोध केला. १९३७ मध्ये जिना यांनी त्याला विरोध केला. नेहरूंनी मुस्लिम लीगचा निषेध केला नाही. जिना यांच्या विरोधानंतर नेहरूंना आपली खर्ची धोक्यात असल्याचे वाटले. जिना यांच्या विरोधानंतर नेहरूंना भीती वाटली. मुस्लिमांनी वंदे मातरमच्या काही शब्दांवर आक्षेप घेतला. काँग्रेसने त्याचे पुनरावलोकन करण्याची चर्चा केली. काँग्रेसने 'वंदे मातरम्'चे तुकडे केले. काँग्रेसने मुस्लिम लीगच्या दबावाखाली हा निर्णय घेतला, असा आरोप मोदींनी केला.

नेहरूंनी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. 'वंदे मातरम्' गीताने आणीबाणीलाही पराभूत केले. मुस्लीम लीगकडून 'वंदे मातरम्'ला कडाडून विरोध केला. काँग्रेसची स्थिती पहिल्यासारखीच आहे. काँग्रेसला देशाच्या फाळणीसमोर झुकावे लागले. INC चे MNC झालेय, असा टोला मोदींनी लगावला.

'वंदे मातरम्' या गीताला १५० वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संसदेत विशेष चर्चा झाली. पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी यांनी 'वंदे मातरम्'वर संबोधन केले. यावेळी एनडीएच्या खासदारांनी 'वंदे मातरम्'च्या घोषणा दिल्या. 'वंदे मातरम्'मळे देशाला नवी ऊर्जा, प्रेरणा मिळते. 'वंदे मातरम्' फक्त स्वातंत्र्याच्या लढाईचा मंत्र नव्हता तर त्यामध्ये भारताचे व्हिजन होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 'वंदे मातरम्'ला १०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा भारत आणीबाणीच्या बंधनात होता, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींवर निशाणा साधला.

'वंदे मातरम्' च्या घोषणा देणं, स्मरण करणे हे आपल्या सर्वांसाठी एक मोठे सौभाग्य आहे. 'वंदे मातरम्'ला १५० वर्षे पूर्ण होत आहेत आणि आपण सर्वजण या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार आहोत, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.  'वंदे मातरम्' स्वातंत्र्याच्या लढ्याला बळ दिले. 'वंदे मातरम्' गीताला ५० वर्षे झाली तेव्हा देश गुलामीत होता. गुलामीच्या काळात धैर्य दिले अन् विचारांना पुनर्जीवित केले. १०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा भारत आणीबाणीच्या बंधनात होता. आज 'वंदे मातरम्'ला १५० वर्षे पूर्ण झाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

'वंदे मातरम्' गाणाऱ्यांवर इंग्रजांनी खूप अत्याचार केला. 'वंदे मातरम्'साठी लहान मुलांनी, महिलांना लढा दिला. एक भारत, श्रेष्ट भारताचा एकच मंत्र तो म्हणजे 'वंदे मातरम्' होय. इंग्रजांनी घाबरून 'वंदे मातरम्' गाण्यावर बंदी घातली होती. इंग्रजांनी तोडा, फोडा अन् राज्य करा, ही नीति वापरली होती, असे पंतप्रधान नरेंद्र म्हणाले.

'वंदे मातरम्' १५० वर्षांचा हा प्रवास अनेक टप्प्यांतून गेला. जेव्हा 'वंदे मातरम्'ला ५० वर्षे पूर्ण झाली तेव्हा देश गुलामगिरीत जगत होता. 'वंदे मातरम्' १०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा देश आणीबाणीच्या साखळ्यांमध्ये जखडला गेला. जेव्हा १०० हा एक अतिशय शुभ सण होता, तेव्हा भारताच्या संविधानाचा गळा दाबण्यात आला. जेव्हा वंदे मातरमला १०० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा देशभक्तीसाठी जगणाऱ्या आणि मरण पावलेल्यांना तुरुंगात टाकण्यात आले. जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला ऊर्जा देणाऱ्या 'वंदे मातरम्'ला १०० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा दुर्दैवाने आपल्या देशात हे घडले, असे मोदी म्हणाले.

'वंदे मातरम्' गाण्याला १५० वर्षे झाली आहेत. ही त्या महान त्यागाची, वैभवाची पुनर्स्थापना करण्याची संधी आहे. दोन्ही सभागृहातील नेत्यांनी ही संधी सोडू नये. १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या 'वंदे मातरम्'वर चर्चा करण्याची मला संधी मिळाली, हे सौभाग्य मानतो. येथे कोणताही सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष नाही. कारण येथे बसलेल्या आपल्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. सर्व खासदारांना 'वंदे मातरम्'चे हे ऋण मान्य करण्याची ही संधी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकीकडे अधिवेशन सुरू आणि दुसरीकडे मंत्री संजय शिरसाटांनी टाकली नागपुरमधील हॉस्टेलवर धाड, नेमकं काय घडलं?

Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीचा जन्म कुठे झाला, मूळची कुठली?

Akshaye Khanna Role In Dhurandhar: धुरंधरमध्ये अक्षय खन्नाने साकारलेला रहमान डकैत नेमका कोण?

मेंदूची रक्तवाहिनी फुटल्यावर शरीरात अचानक दिसतात हे बदल

Bike Taxi: रॅपिडोसह ओलाविरोधात आणखी एक गुन्हा, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT