India Russia summit Saam Tv
देश विदेश

PM मोदी भारत-रशियाच्या शिखर परिषदेला न जाण्याचं कारणं काय? परराष्ट्रमंत्र्यांच्या उपस्थितीत काय होणार चर्चा?

India Russia summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा भारत-रशियाच्या शिखर संमेलनात का गेले नाहीत. अशी चर्चा होत असताना भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर हे रशियाला पोहोचले आहेत. या पाच दिवसाच्या दौऱ्यात परराष्ट्र मंत्री काय चर्चा करणार हे जाणून घेऊ...

Bharat Jadhav

PM Modi India Russia summit :

भारत-रशिया दोन्ही देशातील मैत्री सर्वांना सर्वज्ञात आहे. दोन्ही देशांमध्ये वर्षाकाठी एक शिखर संमेलन आयोजित केलं जातं. यात दोन्ही देशांचे पंतप्रधान सहभागी घेत असतात. परंतु रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून पीएम मोदी हे सलग दुसऱ्यांदा या संमेलनासाठी रशियाला गेलेले नाहीत. तर परराष्ट्रमंत्री जयशंकर हे रशियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. (Latest News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा भारत-रशियाच्या शिखर परिषदेला (India Russia summit) गेले नाहीत. त्याचदरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री (Minister of Foreign Affairs) एस.जयशंकर हे पाच दिवसाच्या दौऱ्यासाठी रशियाला पोहोचले आहेत. ज्या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी गेले नाहीत त्या परिषदेत परराष्ट्रमंत्र्यांच्या उपस्थितीत काय चर्चा होणार यावर चर्चा होत आहे. दरम्यान दरवर्षी शिखर परिषदेत दोन्ही देशांचे पंतप्रधान भेटत असतात.परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा भारत- रशियाच्या वार्षिक शिखर परिषदेसाठी गेले नाहीत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारत आणि रशिया हे दोन्ही देश आळीपाळीने शिखर परिषदेचं आयोजन करत असतात. दोन्ही देशांचे पंतप्रधान एक-दुसऱ्यांच्या देशांचा दौरा करतात. आतापर्यंत भारत-रशियामध्ये (India-Russia) २१ वेळा शिखर परिषद आयोजित करण्यात आलीय. याआधी झालेलं शिखर परिषद ६ डिसेंबर २०२१ ला नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलं होतं. यात रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी भारत दौरा केला होता. त्यानंतर हे वार्षिक शिखर परिषदनंतर होऊ शकली नाही. कारण की, दोन्ही देशाचे प्रमुख एकमेकांच्या देशाचा दौरा करू शकले नाही.

मोदी शिखर परिषदेला का गेले नाहीत?

रशियाने युक्रेनसोबत युद्ध पुकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) मागील वर्षी झालेल्या शिखर परिषदेत भाग घेतला नव्हता. तर सप्टेंबरमध्ये दिल्लीत झालेल्या जी-२० परिषदेत रशियाचे अध्यक्ष पुतीन सहभागी झाले नव्हते, त्यामुळे ही परिषद होऊ शकली नव्हते. यावेळी भारत-रशियाच्या शिखर परिषद रशियाने आयोजित केली होती. परंतु या परिषदेसाठी पंतप्रधान मोदी रशियाला गेले नाहीत. पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) रशियाला (Russia) न जाण्यामागे अद्याप कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. परंतु या शिखर परिषदेचे वेळापत्रक परिषदेला न जाण्याचं प्रमुख कारण सांगितलं जात आहे.

काय होणार चर्चा

परराष्ट्र मंत्री जयशंकर ५ दिवसांच्या रशिया दौऱ्यावर गेले असून ते तेथील नेत्यांना भेटणणार आहेत. या दौऱ्यात जयशंकर पीटर्सबर्गला भेट देणार आहेत. या दौऱ्यात जयशंकर आर्थिक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. रशियाचे उपराष्ट्राध्यक्ष आणि उद्योग व्यापार मंत्री डेनिस मंटुरोव यांच्याशी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची बैठक होणार आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांचीही भेट घेतील.

या भेटीत ते द्विपक्षीय, बहुपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील. भारत आणि रशियाची भागीदारी आणि दोन्ही देशांच्या मैत्रीच्या परीक्षा वेळेनेही घेतलीय. आता परिस्थिती स्थिर आणि लवचिक बनलीय. या दोन्ही देशांच्या भागीदारीला धोरणात्मक भावनेची जोड मिळालीय. दोन्ही देश द्विपक्षीय संबंधाच्या विविध पैलूंवर चर्चा होणार आहे, दोन्ही देश विशेष व्यापार, ऊर्जा, संरक्षण आणि कनेक्टिव्हिटी, अशा विविध मुद्यांवर चर्चा केली जाईल.

भारत आणि रशियामधील भागीदारी

दरम्यान भारत शस्त्रांसाठी रशियावर अवलंबून आहे. भारत ६० ते ७० टक्क्यांच्या प्रमाणात रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी करतो. परंतु गेल्या काही वर्षात भारत सरकारने आपल्या शस्त्रास्त्रे खरेदीमध्ये विविधता आणण्याच प्रयत्न करत आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर जगभरात महागाई वाढली. त्या महागाईचा फटका भारतालाही बसला होता, परंतु त्या महागाईच्या संकटातून भारत लवकर बाहेर पडला. रशियाने भारताना कमी दरात इंधन देण्यास सुरुवात केली, याचा भारताला मोठा फायदा झाला.

यामुळे तेलावर आधारित असलेल्या अर्थव्यवस्थेच्या मंदीचा परिणाम भारतावर झाला नाही. यामुळे महागाई कमी ठेवण्यात मदत झालीय. परमाणू शक्तीचा शांतीपूर्ण वापरात रशिया आणि भारताची भागीदारी आहे. अंतराळ क्षेत्रातही दोन्ही देश एकमेकांना मदत करतात. भारताच्या पहिल्या ह्युमन स्पेसफ्लाइट प्रोग्राम 'गगनयान'मध्येही रशिया भारताला मदत करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

SCROLL FOR NEXT