(अभिजीत देशमुख)
अयोध्येत राम मंदिर व्हावं, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे देखील स्वप्न होतं अयोध्येत राम मंदिर व्हावं आणि ते मोदी साहेबांनी स्वप्न पूर्ण केलं, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डोंबिवलीत आयोजित डोंबिवली जिमखाना उत्सवाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. (Latest News)
डोंबिवली उत्सवात साकारलेल्या राम मंदिराला मुख्यमंत्री यांनी भेट दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. मंत्री रविंद्र चव्हाण यांनी राम मंदिरात दर्शन घ्यायला लावल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराचा (Ram Temple) अभिषेक ("प्राण प्रतिष्ठा") समारंभ येत्या वर्षात २२ जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला १५००-१६०० "प्रतिष्ठित" पाहुण्यांसह सुमारे ८००० जण उपस्थित असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री (Chief Minister) योगी आदित्यनाथ आणि RSS सरसंघचालक मोहन भागवत मंदिराच्या उद्धघाटनाच्या कार्यक्रमावेळी भाविकांना संबोधित करतील.
राम मंदिर ट्रस्टने सर्व माजी पंतप्रधान, सर्व राष्ट्रीय पक्षप्रमुख, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी, दलाई लामा आणि चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन, रजनीकांत, माधुरी दीक्षित नेने यांना निमंत्रित केलंय.या कार्यक्रमासाठी भाजपचे दिग्गज लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते उमा भारती आणि विनय कटियार यांनाही आमंत्रित करणात आले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.