PM Modi Saam Tv
देश विदेश

Mann Ki Baat: तारीख ठरली! पंतप्रधान मोदींची 'मन की बात' पुन्हा सुरू होणार, जनतेला संबोधित करणार

Rohini Gudaghe

एनडीए सरकारचा कार्यकाळ सुरू झाला आहे. पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून पदभार स्विकारला आहे. मागील काही दिवसांपासून आचारसंहितेमुळे पंतप्रधान मोदींचा 'मन की बात' कार्यक्रम बंद होता. परंतु आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी 'मन की बात' कार्यक्रमातून जनतेच्या भेटीला येणार आहेत. ३० जून रोजी मोदी पुन्हा जनतेला संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचा १११ वा भाग ३० जून रोजी (PM Modi) आहे. पंतप्रधानांनी या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांकडून कल्पना आणि सूचना मागवल्या आहेत. हा भाग खूप खास असणार आहे. कारण नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर हा पहिलाच भाग (Mann Ki Baat 111th Episode Date) आहे. मागील काही दिवसांपासून आचारसंहितेमुळे पंतप्रधान मोदींचा हा कार्यक्रम प्रसारित होत नव्हता.

पंतप्रधानांचा जनतेशी संवाद

'मन की बात' हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओवर प्रकाशित होणारा एक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान देशातील महत्त्वाच्या विषयांवर आणि मुद्द्यांवर (Mann Ki Baat 111th Episode ) बोलतात. हा शो ९ वर्षांपूर्वी ३ ऑक्टोबर २०१४ ला लॉन्च झाला होता. हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर प्रसारित केला जातो.

'मन की बात' चा उद्देश?

देशवासीयांशी थेट संवाद साधून देशाच्या विकासाची माहिती देणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी स्वतः जनतेशी संपर्क साधतात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात आचारसंहितेमुळे पंतप्रधान मोदींचा मन की बात कार्यक्रम प्रसारित होत (Mann Ki Baat) नव्हता. यावेळी पुन्हा एनडीएने सरकार स्थापन केलं आहे. मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. नवीन सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच हा भाग प्रसारित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamner News : शेतीतून उत्पन्न नाही, दूध व्यवसायात नुकसान; विवंचनेतून शेतकऱ्याने संपविले जीवन

Papaya Face Pack : पपईपासून बनलेला हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा; स्किनवरील डाग चुटकीसरशी होतील गायब

Pune Crime : रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून १२ वर्षीय मुलीने संपवलं जीवन, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : भरधाव ट्रकने चिरडले; १० गाई दगावल्या, नागपुरमधील घटना

Boat Capsized: प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली; ७८ जणांना जलसमाधी, थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT