पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बिकानेरच्या सभेत पाकिस्तानला ठणकावून सांगितलं. saam tv
देश विदेश

PM Modi Speech : मोदींच्या नसानसांत सिंदूर...पंतप्रधान कडाडले, पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा

PM Modi In Bikaner : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिकानेरमधून थेट पाकिस्तानला इशारा दिला आहे. दहशतवादी हल्ला झाला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल. वेळ आणि पद्धत भारतीय लष्कर निश्चित करेल, असंही मोदी म्हणाले.

Nandkumar Joshi

दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बिकानेरमधील सभेतून पुन्हा कडक शब्दांत इशारा दिला. दहशतवादी हल्ला झाला तर सडेतोड उत्तर दिले जाईल. ते कधी आणि कशा पद्धतीने दिले जाईल हे भारतीय लष्कर ठरवेल, असं मोदी म्हणाले. मोदींचं डोकं शांत आहे, पण रक्त गरम आहे. आता तर नसानसांत सिंदूर वाहतंय, असं पंतप्रधानांनी ठणकावून सांगितलं.

पाकिस्तान कधीच भारताशी थेट लढाईत जिंकू शकत नाही. त्यामुळे दहशतवादाचा आधार घेतला जातो. जेव्हा थेट लढाई होते, तेव्हा पाकिस्तान तोंडावर आपटतो. भारताविरोधात पाकिस्तान नेहमीच दहशतवादाचा शस्त्र म्हणून वापर करतो, असंही मोदी म्हणाले. स्वातंत्र्यानंतर गेल्या काही दशकांपासून असंच होत आलं आहे. पाकिस्तानकडून दहशतवाद पसरवला जातो. निर्दोष लोकांची हत्या करत होते. भारतात दहशतीचं वातावरण निर्माण होत होतं. पण आता पाकिस्तान विसरलाय की आता भारत मातेचा सेवक येथे उभा आहे, असंही पंतप्रधान मोदींनी ठणकावून सांगितलं.

पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ बघा

मोदींचं डोकं शांत आहे....

मोदींचं डोकं शांत आहे, शांत राहतं. पण रक्त गरम आहे. आता तर मोदींच्या धमण्यांमध्ये रक्त नाही तर सिंदूर वाहतंय. आता प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल. पाकिस्तानच्या सेनेला ही किंमत चुकवावी लागेल. पाकिस्तानची अर्थव्यवस्था चुकवेल, असं भारतानं दाखवून दिलं आहे. आता पाकिस्तानसोबत व्यापार नाही आणि चर्चा पण होणार नाही. आता त्यांच्या ताब्यातील काश्मीरवरच चर्चा होईल, असंही मोदींनी निक्षून सांगितलं.

पंतप्रधान मोदींनी पहलगाम हल्ल्याचाही उल्लेख केला. २२ एप्रिलला धर्म विचारून आमच्या भगिनींचं कुंकू पुसलं. गोळ्या पहलगाममध्ये चालवल्या, पण त्या गोळीबारानं १४० कोटी देशवासियांच्या छातीची चाळण झाली होती. त्यावेळी दहशतवाद्यांना गाडून टाकू, असा संकल्प प्रत्येक देशवासियानं केला होता. त्यांना कल्पनाही करता येणार नाही अशी शिक्षा देणार असं निश्चय केला होता. आता तुमच्या आशीर्वादाने आणि भारतीय जवानांच्या शौर्यानं आपण सगळ्यांनी तो संकल्प पूर्ण केला आहे. आपल्या सरकारनं तिन्ही दलांना पूर्णपणे मोकळीक दिली होती. असा काही चक्रव्यूह रचला की पाकिस्तानला गुडघ्यावर यायला भाग पाडले, असंही मोदी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमधील हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

SCROLL FOR NEXT